TRENDING:

लग्नाचं आश्वासन दिलं, गोळ्या खाल्ल्या अन् महिलेसोबत..., पोलिसाचं भयानक कांड, बीड हादरलं!

Last Updated:

Beed News: पीडित महिला सन 2022 पासून पतीपासून वेगळी राहत होती. या परिस्थितीचा फायदा घेत धाराशिवच्या पोलिसाने संधी साधली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : एका विभक्त महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन एका पोलिसानेच फसवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी पोलिसाने पीडितेच्या वैयक्तिक अडचणींचा फायदा घेत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या प्रकरणी पीडित महिलेने बीड व धाराशिव येथील पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार सादर केली असून, चौकशीची मागणी केली आहे.
लग्नाचं आश्वासन दिलं, गोळ्या खाल्ल्या अन् महिलेसोबत..., पोलिसाचं भयानक कांड, बीड हादरलं!
लग्नाचं आश्वासन दिलं, गोळ्या खाल्ल्या अन् महिलेसोबत..., पोलिसाचं भयानक कांड, बीड हादरलं!
advertisement

पीडित महिला सन 2022 पासून पतीपासून वेगळी राहत होती. या परिस्थितीचा फायदा घेत धाराशिव येथील एका पोलिस कर्मचाऱ्याने तिच्याशी संपर्क साधत तिचा विश्वास संपादन केला. “मी पोलीस आहे, तुझ्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुला मदत करीन,” असे सांगून त्याने जवळीक वाढवली. तसेच, स्वतःचे वैवाहिक आयुष्य विस्कळीत असल्याचे सांगत लवकरच घटस्फोट घेऊन लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

advertisement

‘मोनूला शिक्षा देऊ नका...’, त्यानं प्रेम केलं, पण तिनं छळलं, चिठ्ठी लिहून तरुणानं सगळंच संपवलं, संभाजीनगरात खळबळ

10 ऑगस्ट 2025 रोजी आरोपीने महिलेला माजलगाव येथील एका लॉजवर नेले. तिथे लग्नाची हमी देत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. या वेळी आरोपीने काही औषधांचे सेवन केल्यामुळे पीडितेला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, टाके घालण्याची वेळ आली होती. उपचाराचा खर्च आरोपीने ऑनलाइन भरल्याची माहिती पुढे आली असून, तो महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.

advertisement

काही काळानंतर पीडितेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीने स्पष्ट नकार देत तिला अपमानास्पद वागणूक दिली. आपण पोलीस असल्याने कुणीही आपले काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देत त्याने जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच खासगी फोटो व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
त्वचा राहील तेजस्वी, हिवाळ्यात करा अभ्यंग, सोप्या टिप्सचा Video
सर्व पहा

या संपूर्ण प्रकरणामुळे पोलिस दलातील व्यक्तींकडूनच कायद्याचा गैरवापर होत असल्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पीडित महिलेने बलात्कार, गंभीर इजा, धमकी आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
लग्नाचं आश्वासन दिलं, गोळ्या खाल्ल्या अन् महिलेसोबत..., पोलिसाचं भयानक कांड, बीड हादरलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल