राम दिलीप फटाले असं आत्महत्या करणाऱ्या ४२ वर्षीय कापड व्यापाऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी सात जणांवर बीडच्या पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी लक्ष्मण जाधव आणि दिलीप उघडे यांना अटक केली आहे. आरोपी लक्ष्मण जाधव हा भाजपचा प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य आणि भटक्या विमुक्त आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मयत राम फटाले यांनी आरोपी लक्ष्मण जाधव याच्याकडून सात वर्षांपूर्वी अडीच लाख रुपये घेतले होते. फटाले यांनी १० टक्के व्याजदराने या पैशांची परतफेड केली. तरीही आरोपी लक्ष्मण जाधव याच्याकडून व्यापाऱ्याकडे पैशांसाठी तगादा सुरू होता. शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली जात होती.
दोन दिवसांपूर्वी आरोपी जाधवने फटाले यांच्या घरी जाऊन धमकी दिली होती. 'तुला वेळेवर पैसे देणे होत नसेल तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड', अशी धमकी दिली होती. या प्रकारानंतर व्यथित झालेल्या फटाले यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी चार पानी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. यात त्यांनी आरोपी लक्ष्मण जाधवच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.
सुसाईड नोटमध्ये मागितली कुटुंबीयांची माफी
राम फटाले यांनी सहा पानांची सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये मी चांगला पती पिता होऊ शकलो नाही.. अशी खंत व्यक्त करत तुम्ही सर्वजण चांगले रहा.. मुलांनो अभ्यास करा असे म्हणत पत्नीला सर्व जबाबदारी स्वीकारण्याविषयी म्हटले आहे.. तसेच जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना उद्देशून पत्र लिहीत सावकारांची नावे देखील नमूद केले आहेत.
