मध्य प्रदेशातील मंदसौर इथे भाजप नेत्याच्या हायवेवरच्या अश्लील व्हिडिओ स्कँडलवरील वाद अद्याप शमलेला नाही तोच यूपीतील मैनपुरीमधून असाच एक अश्लील व्हिडिओ स्कँडल समोर आला आहे. शहरातील एका विभागाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षाच्या मुलाचे 130 अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे भाजप नेते फोनही उचलत नाहीत. दुसरीकडे, विरोधी पक्षांनी हे प्रकरण तापवल्याचं समजत आहे.
advertisement
हे व्हिडिओ मैनपुरी शहरातील एका प्रसिद्ध मिठाई दुकानाच्या संचालकाच्या धाकट्या भावाचे आणि भाजप नेत्याच्या मुलाचे असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये तो आणि एक महिला अत्यंत अश्लील कृत्य करत आहेत. व्हायरल झालेले 130 व्हिडिओ शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये शूट केले होते. भाजप नेत्याचा मुलगा विवाहित असून तो हे सगळे व्हिडीओ पत्नीला दाखवायचा. त्याच्या या कृत्यांमुळेच पत्नीसोबत वाद सुरू होते.
राग अनावर न झाल्याने तरुणाने तिला सिगरेटचे चटके दिले तेव्हा हा संपूर्ण प्रकार तिने पोलिसांना सांगितला. मात्र कौटुंबिक बाब आणि राजकीय घराण्यामुळे ही गोष्ट दाबण्यात आली. पोलीसही या प्रकरणात फार पडले नाहीत. तरुण त्याच्या प्रेयसीसोबत व्हिडिओ बनवून आणि ते बायकोला दाखवून तिचा मानसिक छळ करायचा. हे व्हिडीओ लीक कसे झाले त्याने स्वत: केले की गर्लफ्रेंडने याबाबत सध्या अनेक प्रश्न आहेत. सोशल मीडियावर याची तुफान चर्चा रंगली आहे.
भाजपने या प्रकरणात मौन बाळगले आहे. महिला मोर्चापासून ते जिल्हा संघटनेपर्यंत कोणताही अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही. सपा, बसपा, काँग्रेसने भाजपला यावरुन चांगलंच घेरलं आहे. भाजप नेत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित लोकांचे दुष्कृत्य जनतेसमोर येत असल्याचे म्हटले जाते. कारवाई करण्याऐवजी, पोलिस-प्रशासन सत्तेच्या दबावाखाली गप्प बसले आहे. 2027 च्या निवडणुकीत जनता त्यांना चांगलाच धडा शिकवेल असा इशारा विरोधकांनी दिला आहे.