ही कहाणी आहे 63 वर्षांच्या एका वकिलाची. शरीर दुखत असल्याने त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर मसाजसाठी एका व्यक्तीचा शोध घेतला. जुलै 2025 मध्ये त्यांचा संपर्क ‘कन्हैय्या’ नावाच्या व्यक्तीशी झाला. तो वकिलांच्या फ्लॅटवर आला, मसाज केला आणि 7 हजार रुपये घेऊन गेला. सेवा ठीक वाटल्याने वकिलांनी त्याला पुन्हा बोलावण्याचा विचार केला.
सप्टेंबरमध्ये जेव्हा त्यांनी मसाजसाठी फोन केला तेव्हा कन्हैय्याने स्वतः न येता आपल्या साथीदाराला, ‘मुन्ना’ला पाठवलं. मसाजच्या बहाण्याने मुन्नाने वकिलांना कपडे काढायला लावले, याने आणखी चांगलं वाटेल असं सांगितलं. वकिलाने कपडे काढले पण टॉवेल गुंडाळला होता. पण त्याला तो टॉवेल काढण्यासाठी त्या व्यक्तीनं काहीतरी सांगून तयार केलं.
advertisement
टॉवेल काढल्यानंतर वकिल शांतपणे मसाजचा आनंद घेत होते आणि गुपचूप त्यांचा नग्न व्हिडिओ रेकॉर्ड केला. वकिलांना शंका आल्यावर त्यांनी त्याला बाहेर काढलं. मात्र, खरी समस्या तेव्हा सुरू झाली.
थोड्याच दिवसांत कन्हैय्या आणि मुन्ना दोघे फ्लॅटवर आले. त्यांनी वकिलाला मारहाण केली आणि धमकी दिली . “50 हजार रुपये द्या, नाहीतर तुमचा व्हिडिओ फेसबुकवर टाकू.” घाबरून वकिलांनी पैसे दिले. पण हे प्रकरण इथंच थांबलं नाही. आरोपींनी आणखी 6 लाख रुपयांची मागणी केली आणि वकिलांच्या नातेवाईकांना फोटो व्हिडीओ पाठवण्याची धमकी दिली.
शेवटी घाबरलेले वकील थेट पोलिसांकडे गेले. बोरीवली पोलिसांनी कारवाई करत अंधेरी आणि खेरवाडी येथून समीर अली (21) आणि भूपेंद्र सिंह (25) यांना अटक केली. या दोघांवर ब्लॅकमेल, मारहाण आणि धमकावण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत.
ही घटना एक धडा आहे. आरामाच्या शोधात कुठलीही बेफिकिरी करू नका. कारण कधी साधं वाटणारं ठिकाण किंवा गोष्ट आयुष्यभराची मोठी समस्या निर्माण करू शकतं.