नेमकं काय घडलं?
ही घटना 12 मे 2025 च्या रात्री घडली, जेव्हा दिलीप कुमार त्यांच्या घरात होते. रात्री काही अज्ञात हल्लेखोर घरात घुसले आणि त्यांनी दिलीप कुमार यांची निर्घृण हत्या केली. सुरुवातीला पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळत नसल्यामुळे हे प्रकरण ब्लाइंट मर्डर केस वाटत होतं. स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं आणि प्रकरण लवकर सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत होता. झुंझुनू पोलिसांनी लगेच एक विशेष तपास पथक (SIT) तयार केलं आणि प्रत्येक दिशेने तपास सुरू केला.
advertisement
संशयाची सुई फिरली अशी
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक पुरावे तपासले. तपासादरम्यान एक धक्कादायक सत्य समोर आलं की, या हत्येत कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीचा सहभाग असू शकतो. कसून चौकशी आणि तांत्रिक तपासानंतर पोलिसांना मृताच्या मोठ्या मुलीचा दिर प्रवीण याच्यावर संशय आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीणचं मृताच्या धाकट्या मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं आणि दिलीप कुमार यांना हे मान्य नव्हतं. यावरून दोघांमध्ये वाद होता, ज्यामुळेच या हत्येचं टोकाचं पाऊल उचललं गेलं.
नियोजनबद्ध कट रचला
पोलिसांनी सांगितलं की, प्रवीणने हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केला. तो रात्री दिलीपच्या घरात घुसला, त्याची हत्या केली आणि त्यानंतर पळून गेला. प्रवीणला पकडण्यासाठी पोलिसांनी आधीच ₹10000 बक्षीस जाहीर केलं होतं. कसून शोध घेतल्यानंतर त्याला चिडावा परिसरातातून अटक करण्यात आली. अटकेनंतर प्रवीणच्या चौकशीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे या प्रकरणाचे अनेक पदर उलगडले. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेलं शस्त्र आणि इतर पुरावेही जप्त केले आहेत.
विश्वास बसत नाही!
झुंझुनूचे पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, "हे एक गुंतागुंतीचं प्रकरण होतं, पण आमच्या टीमने दिवसरात्र काम करून या खुनाचं गूढ उकललं. प्रवीणने आपला गुन्हा कबूल केला आहे आणि आम्ही प्रकरणातील प्रत्येक दुवा जोडत आहोत." ते असंही म्हणाले की, या घटनेने कुटुंबातील विश्वासघाताची एक दुःखद कहाणी समोर आली आहे. या खुलाशाने स्थानिक समाजात खळबळ उडाली आहे. अर्दवाटिया कॉलनीतील रहिवासी सांगतात की, कुटुंबातील सदस्यच असा भयानक गुन्हा करू शकतो, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. एका स्थानिक रहिवासी, श्याम लाल यांनी सांगितलं, "दिलीपजी खूप सज्जन व्यक्ती होते. त्यांच्याच नातेवाईकाने असं केलं हे ऐकून खूप वाईट वाटलं."
हे ही वाचा : बाप रे! पोटात हे काय सापडलं? 'ही' महिला खात होती स्वतःचेच केस; जेव्हा त्रास असह्य झाला...
हे ही वाचा : धक्कादायक! आंबा खाताना घशात अडकली साल, 76 वर्षीय वृद्धाचा श्वास गुदमरला आणि...