धक्कादायक! आंबा खाताना घशात अडकली साल, 76 वर्षीय वृद्धाचा श्वास गुदमरला आणि...

Last Updated:

कासरगोड शहरातील टेलर के.पी. राघवन (76) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवार सकाळी कामावर जाताना रस्त्यावर पिकलेला आंबा दिसला. त्यांनी तो खाल्ला असता त्याची साल गळ्यात अडकल्याने...

choking accident
choking accident
कासारगोडमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. इथे एका पिकलेल्या आंब्याचा साल घशात अडकल्याने एका वृद्ध व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. केरळमधील मोगरालपुथूर बल्लूर शास्तनगर चिनमयम येथील रहिवासी असलेले के.पी. राघवन (वय-76) असे या मृत वृद्धाचे नाव आहे.
राघवन हे कासारगोड शहरातील एका कपड्याच्या दुकानात टेलर म्हणून काम करत होते. बुधवारी सकाळी ते कामावर जात असताना त्यांना रस्त्यात एक पिकलेला आंबा सापडला. तो आंबा खात असताना, त्याची साल त्यांच्या घशात अडकली आणि ते तिथेच कोसळले.
जवळपासच्या लोकांनी तात्काळ राघवन यांना कासारगोड शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांना त्यांना वाचवता आले नाही. राघवन यांच्या निधनाने कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पत्नी निर्मला, मुले गणेश, अविनाश, अनिता, सरिता आणि सुना सौम्या, मनोज, अजित असा परिवार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
धक्कादायक! आंबा खाताना घशात अडकली साल, 76 वर्षीय वृद्धाचा श्वास गुदमरला आणि...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement