पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गांधी रोड वरील खंडेलवाल आभूषण या सराफा दुकानात ही घटना घडली. उच्चशिक्षित आणि सदन घराच्या दिसणाऱ्या बंटी-बबली आणि आजीने ही चोरी केली. या तिन्ही चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून दुकानातील कर्मचारी महिलेला आभूषणे दाखविण्यास सांगितलं. यातील पुरुष आरोपीने कर्मचारी महिलेचं लक्ष आपल्याकडे वळवलं आणि महिलेनी हात चलाखी दाखवत वृद्ध महिलेच्या हातात हे दागिने देऊन दिले. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 10 ग्रामची सोन्याचं कानातलं सहजपणे या टोळीने लंपास केलं.
advertisement
दुकान मालकाने दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेनं दीड वर्षांपूर्वी सुद्धा आपल्या दुकानात चोरी केली होती मात्र तिचा थांगपत्ता आतापर्यंत लागलेला नाही तर आता परत या महिलेनं दुकानात चोरी केली आहे. या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह. मात्र या टोळीचा पोलिसांना अद्यापही कोणताही सुगावा लागलेला नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
अडीच लाखांची सोनं साखळी चोरणारी महिला सापडली
दरम्यान, मलाबार गोल्ड अँड डायमंड या सोन्याच्या दुकानातही चोरीची घटना घडली. अडीच लाखांची सोन्याची चेन चोरी करणाऱ्या महिलेला अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या सहा तासांच्या आत पकडलं आहे. या चोरट्या महिलेकडून चोरीचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेनं या घटनेचा तपास केला. यामध्ये पोलिसांनी ईशा सत्यप्रकाश पांडे या चोरी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे.
विशेष म्हणजे, या महिलेचा समोरच असलेल्या एका सोन्याच्या दुकानातील चोरीचा प्रयत्न फसला आहे. ही महिला चेहऱ्यावर स्कार्फ बांधून दुकानात येते आणि विविध सोन्याच्या वस्तू दाखवायला लावते. सेल्समनची नजर चुकवून दागिने चोरी करून निघून जाते. स्थानिक गुन्हे शाखेने महिलेला अटक केली असून तिच्याकडील दुचाकी ही पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास सिव्हिल लाइन पोलीस करीत आहे.