TRENDING:

आधी विश्वास जिंकला, मग माय-लेकाचं धक्कादायक कांड, 16 जण फसले, छ. संभाजीनगरात खळबळ

Last Updated:

Chhatrapati Sambhajiangar: सुरुवातीला लोकांचा विश्वास जिंकला आणि पुन्हा आरोपी माय-लेकाने कोणालाही सोडले नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : भिशीच्या माध्यमातून जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 16 जणांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. या 16 जणांची माय-लेकाने सुमारे 2 कोटी 99 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. नंदाबाई रमेश आधुडे (45) आणि तिचा मुलगा सौरभ रमेश आधुडे (21 दोघेही रा. बीड बायपास, मूळ जालना घनसावंगी) अशी या आरोपींची नावे असून, या दोघांना न्यायालयाने 3 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले यांनी दिली आहे.
आधी विश्वास जिंकला, मग माय-लेकांचं मोठं कांड, 16 जण फसले, छ. संभाजीनगरात खळबळ
आधी विश्वास जिंकला, मग माय-लेकांचं मोठं कांड, 16 जण फसले, छ. संभाजीनगरात खळबळ
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, बीड बायपास परिसरातील व्यंकटेश पार्क येथे राहणारी नंदाबाई रमेश आधुडे ही 2018 पासून भिशी चालवत होती. सुरुवातीला लहान भिश्यांचे व्यवहार वेळेवर पूर्ण करून त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला, मात्र नोव्हेंबर 2022 पासून मोठ्या रकमांच्या भिश्या सुरू करून त्यांनी गुंतवणुकीचा ओघ स्वतःकडे वळवला.

...त्याला वर पाठवू का? ‘ती’ रुममध्ये होती अन् घटस्फोटीत पती आला, फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राडा

advertisement

जयश्री गिरी यांनी या भिशीत 20 महिने दरमहा 50 हजार रुपये, याप्रमाणे दहा लाख भरले. यापूर्वीचे दहा लाख आणि हे दहा लाख असे एकूण त्यांचे 20 लाख रुपये नंदाबाईकडे जमा होते. या माय-लेकाने लोकांचा विश्वास संपादन करून एकूण 2 कोटी 99 लाख 20 हजार रुपये घेतले. परंतु मुदत संपल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि विविध प्रकारची कारणे सांगितले. फसवणूक झाल्याचे समजताच गिरी यांच्यासह इतर नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले.

advertisement

View More

भिशीच्या नावाखाली या लोकांची फसवणूक 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: हळदीनं मार्केट खाल्लं, डाळिंब अन् आल्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

या प्रकरणातील फसवणुकीची व्याप्ती मोठी असून आरोपी माय-लेकाने कोणालाही सोडले नाही. यामध्ये सपना मरकड 50 लाख, मीरा फलके 50 लाख, तर विलास माने 30 लाख, कमलबाई सुरसे 21.50 लाख आणि जयश्री गिरी 20 लाख, यांचीही मोठी रक्कम बुडाली आहे. याशिवाय सावित्री आघाव 19 लाख 80 हजार, नंदा बेंद्रे 15 लाख 50 हजार, रंजना आघाव 16 लाख 20 हजार, गुलाब राठोड 15 लाख 50 हजार, तर राम घायाळ यांची 4 लाख रुपयांची फसवणूक केली. अशा एकूण 16 लोकांनी 2 कोटी 99 लाख 20 हजार 500 रोख नंदाबाई व सौरभ कडे जमा केले होते.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
आधी विश्वास जिंकला, मग माय-लेकाचं धक्कादायक कांड, 16 जण फसले, छ. संभाजीनगरात खळबळ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल