चहाच्या वादातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. धर्मवीर असं या आरोपी पतीचं नाव आहे. तर सुंदरी असं मृत पत्नीचं नाव. गाझियाबादमध्ये राहणारं हे दाम्पत्य. मंगळवारी सकाळी सहा वाजता त्यांच्या चहा बनवण्यावरून वाद झाला. धर्मवीर इतका संतप्त झाला की त्याने रागात घरात ठेवलेली धारदार तलवार काढली आणि त्याने पत्नीच्या मानेवर वार केले. सुंदरी चहा बनवत होती तेव्हा त्याने मागून तिच्या मानेवर तलवार फिरवली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तो फरार झाला.
advertisement
असा हा राजाबाबू! कधी डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून त्याने 6 महिलांशी केलं लग्न, पण अखेर...
सुंदरी आणि धरमवीर यांना पाच मुले आहेत. ही घटना घडली तेव्हा मुलं झोपली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धरमवीर सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून लवकरच त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली जाईल.
दरम्यान उत्तर प्रदेशमध्येच काही वर्षांपूर्वी असंच एक प्रकरण घडलं होतं. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बारबीरमध्ये 40 वर्षीय पतीने 35 वर्षीय पत्नीची चहाच्या वादातून हत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी रेणूनं दिलेल्या चहामध्ये साखरेचं प्रमाण नेहमीपेक्षा कमी होतं. म्हणून संतापलेल्या पती बबलू कुमार रागाने चवताळून उठला. त्याने तिच्याशी वाद घातला आणि तिला मारहाण केली. त्याचा राग वढ्यावरच शांत नाही झाला तर नंतर त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा कापला.
भटक्या कुत्र्यांना पकडून दिल्यानंतर भयंकर घडतंय; संपूर्ण कुटुंब दहशतीत
आपल्याच वडिलांनी आईला अशा निर्घृण पद्धतीने मारताना पाहिल्यानंतर तीन मुलं धावत आली. पण ते आईकडे जाईपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात स्वयंपाकघरात तडफडत होती. अखेर तिने आपल्या मुलांदेखत अखेरचा श्वास घेतला.
