आर्थिक अडचणींमुळे घर विकावे लागले
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशराम पाटील मूळचा राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण येथील आहे. तो गेल्या काही वर्षांपासून पत्नी, दोन मुले आणि वडिलांसह महालक्ष्मीनगरमधील पोद्दार हायस्कुलमागे भाड्याच्या घरात राहत होता. तो उद्यमनगरात फॅब्रिकेशनचे काम करतो. मोठा मुलगा खासगी नोकरी करतो, तर लहान मुलगा शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपूर्वी आर्थिक अडचणींमुळे त्यांना स्वतःचे घर विकावे लागले होते. तेव्हापासून ते भाड्याच्या घरात राहत होते.
advertisement
मध्यरात्री वाद विकोपाला गेला
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाटील दाम्पत्यामध्ये जोरदार वाद सुरू झाला. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले बाहेर गेली होती, तर वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. याच वादातून रागाच्या भरात परशरामने पत्नीचा गळा दाबला आणि ती बेशुद्ध झाल्यानंतर बेडरूममध्ये ठेवलेल्या घरातील चाकूने तिचा चिरला.
पत्नीचा खून केल्यानंतर परशरामने स्वतःच्या मोबाईलवरून 112 नंबरवर पोलिसांना फोन केला. पोलिसांना माहिती मिळताच, कॉन्स्टेबल रोहन वाकरेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परशरामला ताब्यात घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
'पैशांचा हिशोब देईना, म्हणून खून केला'
नेमका वाद काय होता, याबद्दल बोलताना पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले की, "पाटील कुटुंबाने घरविक्रीतून आलेले पैसे, इतरांकडून हातउसने घेतलेले, तसेच मुलांच्या नावावर फायनान्स कंपनीतून प्रत्येकी एक लाख रुपयांचे कर्ज काढले होते. या पैशांचा हिशोब पत्नीकडून मिळत नव्हता, त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते." या माहितीची पडताळणी पोलीस करत आहेत. दरम्यान, आईचा खून झाला आणि वडील जेलमध्ये गेले, यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांना मोठा धक्का बसला आहे. पै-पाहुण्यांच्या मदतीने मुलांनी पंचगंगा स्मशानघाटावर आपल्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
हे ही वाचा : "आंबा देतो", म्हणत 55 वर्षीय नराधमाचे 16 महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार!