Hingoli Crime : सोशल मीडियावर मैत्री, मग घरात बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बॉयफ्रेंडच्या बापानेही सोडलं नाही... हिंगोलीत भयंकर घटना
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सोशल मिडीयावर (Social media) मैत्री करून आणि लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) बाप लेकाने (Father and Son) बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
Hingoli Crime News : मनीष खरात, हिंगोली : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सोशल मिडीयावर (Social media) मैत्री करून आणि लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) बाप लेकाने (Father and Son) बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने बाप-लेकाविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) आरोपी दीपक नागपूरे (वडील) आणि अप्लवयीन मुलगा या दोघांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच या दोन्ही आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करतायत.
मिळालेल्या माहितीनुसार,पीडित अल्पवयीन मुलगी ही मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील रहिवासी आहे. या मुलीची आरोपी मुलासोबत वीप्ले या अॅपवरून मैत्री झाली होती. या मैत्रीचे पुढे जाऊन प्रेमात रुपांतर झाले होते.यावेळेस मुलाने मुलीला लग्नाचे आमिष देखील दाखवले होते. या आमिषाला बळी पडताच तिला हिंगोलीत बोलावून घेतलं होतं.त्यानंतर आरोपी बाप लेकाने तिच्यावर अत्याचार केला होता.
advertisement
पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी मुलाने लग्नाचे आमिष दाखवून तिला हिंगोलीत बोलावून घेतलं होतं. त्यानंतर त्याने मला घरात नेऊन माझ्यावर अत्याचार केला होता.त्यानंतर मित्रांच्या वडिलांनी देखील तिला सो़डलं नाही. माझ्या मुलासोबत लग्न करायचं असेल तर माझ्यासोबत देखील शरीरसंबंध ठेवावे लागतील,असे सांगत बाप लेकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
या घटनेनंतर पीडित तरूणीने या बाप-लेकाच्या तावडीतून सूटका करण्याचा प्रयत्न केला. पण तिला फारसं यश आलं नाही.त्यानंतर तिने पोलीस हेल्पलाईनवर फोन करून मदत मागितली होती.त्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला होता. यावेळी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी दीपक नागपूरे (वडील) आणि अल्पवयीन मुलगा या दोघांना अटक करण्यात आली असून बाप लेकावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
Aug 06, 2025 7:13 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Hingoli Crime : सोशल मीडियावर मैत्री, मग घरात बोलावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बॉयफ्रेंडच्या बापानेही सोडलं नाही... हिंगोलीत भयंकर घटना










