मुजफ्फरपुर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहेत. सायबर क्राईमच्या माध्यमातून अनेक जणांना बळी बनवले जात आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस बनून सायबर गुन्हेगारांनी तब्बल 103 कोटी रुपयांची लूट केल्याची घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
मुजफ्फरपुर पोलिसांनी सायबर फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या घोटाळेबाजांनी आतापर्यंत विविध लोकांची तब्बल 103 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे. हे सर्व गुन्हेगार, लोकांना पोलीस अधिकारी म्हणून सांगायचे आणि धमकावून मोठ्या प्रमाणात पैसे उकळायचे. पोलिसांचे नाव सांगितल्याने बहुतांश लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रारही केली नाही. मात्र, यावेळी पीडितेच्या तक्रारीची आणि लोकल 18 बिहारच्या बातमीची दखल घेत पोलिसांनी सापळा रचला आणि या टोळीतील अनेक गुन्हेगारांना पकडले. आता त्यांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
याबाबत SSP राकेश कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, सायबर फसवणुकीच्या घटना पाहता सायबर विभागाच्या डीएसपी सीमा देवी यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली होती. या टीमने छापे टाकून मोतिहारी, दरभंगा आणि मुझफ्फरपूर येथून अर्धा डझन सायबर गुन्हेगारांना अटक केली. या सर्वांचे संबंध परदेशात जोडले गेले आहे.
अनोखा जिल्हा, जिथं 10 वर्षात 5 कलेक्टर वर्षभरही टिकले नाही, पण काय आहे यामागचं नेमकं कारण?
अंकित कुमार, दीपक कुमार, रौशन कुमार (सर्व रा. दरभंगा), अरशद आलम, अमजद आलम (दोन्ही रा. मोतिहारी जिल्हा) आणि मुजफ्फरपुरच्या साहेबगंज येथील रहिवासी जितेंद्र कुमार अशी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी आरोपींपासून चार लॅपटॉप, विविध बँकांच्या माध्यमातून 19 पासबुक, 8 चेकबुक, 4 आधार कार्ड, 17 डेबिट कार्ड, 5 पॅन कार्ड, 13 ओपनिंग किट, 4 सिम कार्ड आणि 7 मोबाइल फोन जप्त केले आहेत.
अशाप्रकारे करायचे लूट -
SSP यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, या आरोपींना आतापर्यंत 103 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या सायबर गुन्हेगारांनी सर्वाधिक महिलांना लक्ष केले. हे सर्वजण त्यांना पोलीस म्हणून कॉल करायचे आणि त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. काही दिवसांपूर्वी सुद्धा शहरातील सिकंदरपुरच्या रहिवासी असलेल्या एका अंड्याच्या व्यावसायिकाला अशाच प्रकारचा अनुभव आला होता. मात्र, त्यांनी वेळीच पोलिसांत तक्रार दिल्याने ते होणाऱ्या नुकसानापासून वाचले.