अनुजा अभिजित पवार (रा. जयसिंगपूर) या महिलेची ही फसवणूक झाली आहे. त्यांच्या ओळखीच्या उमेश जगन्नाथ जोशी (वय-45), अस्मिता जोशी (वय-40, दोघेही रा. विश्रामबाग) आणि संतोष सुधाकर पाठक (वय-54, रा. यशवंतनगर, सांगली) यांनी अनुजा यांना विश्रामबाग येथील ‘मुरली ॲपेक्स सदनिके’त बोलावले.
15 सप्टेंबर 2022 ते 11 सप्टेंबर 2025 या कालावधीत या तिघांनी अनुजा यांना ‘गुंतवणूक केल्यास 16 महिन्यांत पैसे दुप्पट मिळतील’, असे आमिष दाखवले. त्यांच्या भूलथापांना बळी पडून अनुजा यांनी टप्प्याटप्प्याने एकूण 10 लाख रुपये त्यांच्याकडे दिले.
advertisement
फसवणूक उघडकीस
गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही आरोपींनी अनुजा यांना पैसे परत केले नाहीत. वारंवार मागणी करूनही ते टाळाटाळ करत होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अनुजा यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा : साताऱ्यात कारखाली दबून हॉटेल व्यावसायिक तरुणाचा दुर्दैवी अंत, बायकोच्या डोळ्यादेखत तडफडून सोडले प्राण