Chhatrapati Sambhajinagar: जीवलग मित्राचं डोकं कापलं, पोलिसांना टाळलं मात्र, एआय ठरलं गेमचेंजर! 9 दिवसात गुन्हेगार गजाआड
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: पोलिसांना मृताच्या जबड्यात एक स्टील क्लिप मिळाली आणि तपासाला एक नवीन वळण मिळालं.
छत्रपती संभाजीनगर: सध्याच्या काळात अनेक दैनंदिन काम सोपी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जात आहे. इतकंच नाहीतर गुन्हे उलगडण्यासाठी देखील एआय उपयुक्त ठरत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी एका खुनाचा उलगडा करत गुन्हेगाराला गजाआड पाठवलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांनी नऊ दिवसांमध्ये खुनाचा तपास केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गौताळा अभयारण्यालगत असलेल्या 'सनसेट पॉईंट' जवळच्या जंगलात 3 सप्टेंबर (बुधवारी) रोजी एका तरुणाचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळला होता. त्यानंतर 24 तासांत त्याचं शिरही मिळालं. मृतदेह इतका विद्रूप होता की, त्याची ओळख पटवणे अशक्य होतं. मात्र, पोलिसांना मृताच्या जबड्यात एक स्टील क्लिप मिळाली आणि तपासाला एक नवीन वळण मिळालं.
advertisement
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. स्टील क्लिपवरील तपशिलाच्या आधारे 'आर्टिफिशियल इंटिलिजन्स'चा (एआय) वापर करून क्लिपचं उत्पादन करणारी कंपनी, तिचे वितरक आणि राज्यातील वापराची ठिकाणं शोधून काढण्यात आली. ही क्लिप इगतपुरी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये निखिल हिरामण सूर्यवंशी नावाच्या व्यक्तीला एका अपघातानंतर बसवण्यात आल्याचं निष्पन्न झालं. निखिल बेपत्ता असल्याची नोंद चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये होती. घटनास्थळी आढळलेली अंतर्वस्त्रे, घड्याळ आणि क्लिपच्या आधारे कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली.
advertisement
निखिल हिराराम सूर्यवंशी (वय 28, रा. सिंधी, तालुका चाळीसगाव), असं मृत तरुणाचं नाव आहे. निखिल रोजंदारीवर शेतमजुरी करत होता. बकऱ्या चोरून गावात गुंडगिरीही करत होता. श्रवण ज्ञानेश्वर धनगर हा त्याचा जिवलग मित्र होता. पोलीस तपासादरम्यान निखिलचे सर्व मित्र पोलिसांसमोर आले. मात्र, श्रवण आला नव्हता त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रीत केलं.
advertisement
उलट तपासणीत श्रवण गडबडला आणि त्याने हत्येची कबुली दिली. 26 ऑगस्ट रोजी मैत्रिणीला भेटायचं असल्याचं सांगून निखिल दुचाकीने श्रवणला सायगावमार्गे सनसेट पॉइंटजवळ घेऊन गेला होता. "मी चोऱ्या, गुंडगिरी आणि व्यसनं करतो. तुला माझे कुकर्म माहिती असल्याने माझी बदनामी होते. तू मेलास तरच माझं लग्न होईल, त्यामुळे तुला मारायचं आहे," असं म्हणत निखिलने श्रवणवर कुऱ्हाड उगरली. मात्र, श्रवणने वार चुकवत निखिलच्या गुप्तांगावर लाथ मारली. तो खाली कोसळताच श्रवणने त्याच कुऱ्हाडीने निखिलचं शीर धडापासून वेगळं केलं.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 13, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhatrapati Sambhajinagar: जीवलग मित्राचं डोकं कापलं, पोलिसांना टाळलं मात्र, एआय ठरलं गेमचेंजर! 9 दिवसात गुन्हेगार गजाआड