जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात दारूच्या नशेत पतीने पत्नीवर हल्ला केला. आरोपी पतीने तिच्या हाताच्या बोटाचा तुकडा तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीकृष्ण नगर येथील खंडेराव पाटील यांनी पत्नी सोनीबाईसोबत रात्री वाद घालताना तिच्या उजव्या हाताला चावा घेतला. चावा इतका जोरदार होता की करंगळीच्या बाजूचे बोट नखासकट तुटून पडले.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडितेचा पती खंडेराव आणि भाऊ ईश्वर यांच्यात वाद सुरू होता. यावेळी दारुच्या नशेत असलेल्या खंडेरावने आपल्या मेहुण्याला बेदम मारहाण केली. यावेळी सोनीबाई आपला भाऊ ईश्वरला वाचवण्यासाठी भांडणात पडल्या.
advertisement
यावेळी खंडेरावने सोनीबाई यांच्यावरच अमानुष हल्ला केला. त्याने पत्नीच्या बोटाचा चावा घेत, थेट नखासकट बोटाचा तुकडा पाडला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडेराव पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
