ही घटना कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील साई चौक परिसरात घडली. गुरुवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. येथील एका भाजी विक्री करणाऱ्या महिलेला मद्यधुंद व्यक्तीने "तू बांगलादेशी आहेस, पुरावे दाखव नाहीतर तुला इकडून हाकलून देईल," असे म्हणत भररस्त्यात शिवीगाळ सुरू केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे महिला घाबरून गेली आणि तिने तातडीने खडकपाडा पोलिसांना संपर्क केला. पण पोलिसांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
advertisement
चार वेळा फोन करूनही पोलिसांनी घटनास्थळी यायला अर्धा तास लावला. दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या भररस्त्यात सुरू असलेल्या अश्लील वागणुकीमुळे भाजी खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा संयम सुटला. त्यांनी त्या इसमाला पकडून चांगलाच चोप दिला. या सगळ्या गोंधळादरम्यान संबंधित इसमाने आपली दुचाकी घटनास्थळीच टाकून पळ काढला.
चार वेळा फोन करून पोलीस वेळेवर न पोहोचल्यामुळे महिलेने आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केला आहे. सध्या या घटनेनंतर उशिरा पोहोचलेल्या पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात बोलवून तिची तक्रार ऐकून पुढील तपास सुरू केला आहे.
