TRENDING:

बोंबला! 'सुहागरात'ला नववधूनं नवरदेवासोबत नको तेच केलं, लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच...; अख्खं सासर हादरलं

Last Updated:

लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूने नवरदेवासोबत असा कांड केला की नवरदेवासह संपूर्ण कुटुंब हादरलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ, 21 डिसेंबर : अगदी साधेपणानं एका मंदिरात लग्न लागलं... वरात घरी आली... घरात सर्व जण आनंदात होते... नववधूसोबत संसार थाटण्यासाठी नवरदेव उत्सुक होता...  सुहागरातची वेळ जवळ आली... पण लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूने नवरदेवासोबत असा कांड केला की नवरदेवासह संपूर्ण कुटुंब हादरलं. उत्तर प्रदेशमधील लग्नाची ही स्टोरी आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

आग्रा येथील नागला रामबल येथील रहिवासी अनिल कुमार लग्नासाठी मुलगी शोधत होता. त्याने त्याच्या ओळखीतील राजेशकुमार दोहराला याबाबत सांगितलं. राजेशनं त्याची ओळख हातरस येथील सासनीतल्या सुनीलशी करून दिली आणि मग सुनीलने प्रदीप नावाच्या व्यक्तीशी. प्रदीपने अनिलला एक मुलगी दाखवली. रजनी असं तिचं नाव. रजनीनं सांगितलं की ती गरीब कुटुंबातील आहे. अशा परिस्थितीत वराला दोन्ही बाजूंचा खर्च उचलावा लागणार आहे. यासाठी अनिल तयार झाला. त्याने रजनीला लग्नखर्चासाठी  70 हजार रुपये दिले.

advertisement

लग्नाच्या 4 तासांतच नवरदेवाची लागली वाट! नववधूनं केलं असं काही की पुरता उद्ध्वस्त झाला

18 डिसेंबर रोजी एका मंदिरात अनिल आणि रजनीचा विवाह  झाला. अनिल रजनीला घेऊन घरी आला. लग्नाच्या पहिल्याच रात्री रजनी आजारी पडली. औषध हवं म्हणून ती पतीला घेऊन घराबाहेर पडली.दोघंही हातरस रोडवर गेले. तिथं ज्यानं अनिल आणि रजनीचं लग्न जमवलं तो प्रदीप आधीपासूनच होता. रजनीनं काहीतरी बहाणा करून अनिलला सोडून प्रदीपसोबत पळ काढला.

advertisement

वराने येऊन हा प्रकार घरच्यांना सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर वर आणि त्याच्या कुटुंबानं तात्काळ ट्रान्सयामुना पोलिसात याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी लग्नाच्या तिसऱ्या दिवशी वधूला अटक केली. वधूवर फसवणूक केल्याचा आरोप आहे. तिनं फसवणुकीसाठीच लग्न केलं होतं. वधूने सांगितलं की, ती मूळची कटघर, मुरादाबादची आहे. तिनं केवळ पैशांसाठी लग्न केलं होतं, तिचा हिस्सा नवरदेवाने दिलेल्या 70 हजार रुपयांमध्ये होता.

advertisement

मुलाचं निधन झालं अन् 70 वर्षांच्या सासऱ्याचं 28 वर्षांच्या सुनेवर जडला जीव; मंदिरात जाऊन केलं लग्न

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
निर्णयावर ठाम राहिले, सुरू केला व्यवसाय, अच्युतराव यांच्या यशाची कहाणी
सर्व पहा

मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीचा पत्ता बरोबर नसल्याचं पोलिसांचं म्हणणे आहे. अशा परिस्थितीत त्याच्या पत्त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. नाहीतर ती पुन्हा कोणाची तरी फसवणूक करेल. सध्या तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. आता नवरीला पकडल्यानंतर तिच्या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेतला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
बोंबला! 'सुहागरात'ला नववधूनं नवरदेवासोबत नको तेच केलं, लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच...; अख्खं सासर हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल