लग्नाच्या 4 तासांतच नवरदेवाची लागली वाट! नववधूनं केलं असं काही की पुरता उद्ध्वस्त झाला
- Published by:Priya Lad
Last Updated:
लग्नानंतर 4 तासांच नवरीने नवरदेवासोबत असं काही केलं की त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता.
अजमेर, 19 डिसेंबर : लग्नानंतर काही वर्षे सर्वकाही सुरळीत असतं. पण काही वर्षांनी वाद, भांडणं होऊ लागतात. लग्न करून माझ्या आयुष्याची पार वाट लागली असे म्हणणारे किती तरी लोक आहेत. पण एक व्यक्ती जिनं लग्न करून संसारही थाटला नव्हता. किंबहुना लग्नानंतर 4 तासांतच त्याची वाट लागली आहे. नववधूनं नवरदेवासोबत असं काही केलं की तो पुरता उद्ध्वस्त झाला आहे.
राजस्थानमधील हे प्रकरण आहे. गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील डुंगरा गावचा रहिवासी असलेला भटू भाई रावलचं लग्न भिंडा गावातील नीता बेन नावाच्या तरुणीशी ठरलं. दलाल ललित उर्फ टायगरनं 2 लाख 20 हजार रुपयांत हे लग्न ठरवलं. लग्नासाठी दलालाने आधीच 1 लाख 20 हजार रुपये घेतले होते. उर्वरित एक लाख रुपये लग्नानंतर देण्याचं ठरलं.
advertisement
त्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी वर भटूभाई कुटुंब आणि लग्नातील इतर पाहुण्यांसह वधूच्या घरी पोहोचला. तिथं त्यांचं लग्न अगदी सुरळीत पार पडलं. लग्नाची मिरवणूक निघाली. वर आनंदाने वधूला आपल्या घरी घेऊन जात होता. पण आपल्यासोबत काय घडणार आहे, याची त्याला कल्पना नव्हती.
advertisement
वधूनं आपल्याला नवीन कपडे घ्यायचं असल्याचं सांगितलं. वधूचा हट्ट पुरवण्यासाठी वरानं गाडी थांबवली. वधू गाडीतून खाली उतरली. त्याचवेळी मागून एक बाईकस्वार तरुण आला. वधू त्याच्या बाईकवर बसली आणि त्याच्यासोबत फरार झाली. वराला आणि त्याच्या कुटुंबीयांना काही समजण्यापूर्वीच वधूने तिथून पळ काढला. वरानं लगेच पोलीस ठाणं गाठलं.
Viral Video: 'KISS कर नाहीतर...'; नवरदेवाची नवरीकडे स्टेजवरच विचित्र मागणी; VIDEO पाहून भडकले नेटकरी
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण डुंगरपूर जिल्ह्यातील चौरासी पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. अखेर दीड महिन्यानंतर पोलिसांनी वधू आणि दलाला अटक केली आहे.
view commentsLocation :
Rajasthan
First Published :
December 19, 2023 9:24 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
लग्नाच्या 4 तासांतच नवरदेवाची लागली वाट! नववधूनं केलं असं काही की पुरता उद्ध्वस्त झाला










