advertisement

धक्कादायक! एक कप चहासाठी संपवला आयुष्याचा गोडवा; नवऱ्याने चिरला बायकोचा गळा

Last Updated:

चहाच्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चहासाठी हत्या
चहासाठी हत्या
लखनऊ, 19 डिसेंबर : अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते. काही घरात तर चहावरून वादही पाहायला मिळतात. आज चहा कुणी करायचा इथपासून ते चहात साखर कमी-जास्त झाली, कोणत्याही कारणामुळे चहावरून भांडणं होतात. पण काही प्रकरणात हे वाद इतके टोकाला पोहोचले की जीवही गेले आहेत. उत्तर प्रदेशमधून असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं.
चहाच्या वादातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. धर्मवीर असं या आरोपी पतीचं नाव आहे. तर सुंदरी असं मृत पत्नीचं नाव. गाझियाबादमध्ये राहणारं हे दाम्पत्य. मंगळवारी सकाळी सहा वाजता त्यांच्या चहा बनवण्यावरून वाद झाला. धर्मवीर इतका संतप्त झाला की त्याने रागात घरात ठेवलेली धारदार तलवार काढली आणि त्याने पत्नीच्या मानेवर वार केले. सुंदरी चहा बनवत होती तेव्हा त्याने मागून तिच्या मानेवर तलवार फिरवली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तो फरार झाला.
advertisement
सुंदरी आणि धरमवीर यांना पाच मुले आहेत. ही घटना घडली तेव्हा मुलं झोपली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धरमवीर सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून लवकरच त्याला ताब्यात घेऊन कारवाई केली जाईल.
advertisement
दरम्यान उत्तर प्रदेशमध्येच काही वर्षांपूर्वी असंच एक प्रकरण घडलं होतं. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बारबीरमध्ये 40 वर्षीय पतीने 35 वर्षीय पत्नीची चहाच्या वादातून हत्या केली होती.  मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी रेणूनं दिलेल्या चहामध्ये साखरेचं प्रमाण नेहमीपेक्षा कमी होतं. म्हणून संतापलेल्या पती बबलू कुमार रागाने चवताळून उठला. त्याने तिच्याशी वाद घातला आणि तिला मारहाण केली. त्याचा राग वढ्यावरच शांत नाही झाला तर नंतर त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा कापला.
advertisement
आपल्याच वडिलांनी आईला अशा निर्घृण पद्धतीने मारताना पाहिल्यानंतर तीन मुलं धावत आली. पण ते आईकडे जाईपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात स्वयंपाकघरात तडफडत होती. अखेर तिने आपल्या मुलांदेखत अखेरचा श्वास घेतला.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
धक्कादायक! एक कप चहासाठी संपवला आयुष्याचा गोडवा; नवऱ्याने चिरला बायकोचा गळा
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement