मित्र-मैत्रिणीच्या वादात गमवला 5 जणांनी जीव
संबंधित धक्कादायक अपघात पिंपळी येथील पुलावर रात्री 10 च्या सुमारास घडला. यामध्ये जीपचालक आसिफ हाकीमुद्दीन सैफी (वय-28, डेहराडून, उत्तराखंड), रिक्षाचालक इब्राहिम इस्माइल लोणे (वय-62, रा. पिंपळी), रिक्षातील प्रवासी नियाज महंमद हुसेन सय्यद (वय-50) आणि शबाना नियाज सय्यद (वय-40) आणि हैदर नियाज सय्यद (वय-4, सर्व. रा. पर्वती, पुणे) या पाच जणांचा मृत्यू झाला. नियाज आणि शबाना यांचा मुलगा पिंपळी येथे मदारशामुळे शिक्षण घेत आहे. त्याला भेटण्यासाठी सय्यद कुटुंबिय आले होते. त्याला भेटून पुण्यासा परतत असताना त्यांचा अपघात झाला.
advertisement
...असा घडला संपूर्ण नाट्यमय आणि थरारक प्रकार
जीपचालक आपल्या मैत्रिणीसोबत गोव्याला फिरायला गेला होता. गोव्यावरून येत असताना दोघांच्यात वाद झाले. त्यामुळे मैत्रिणीने जीपमधून उतरण्याचा हट्ट केला. चिपळूणपर्यंत त्यांचा हा वाद सुरू होता. शेवटी हा वाद टोकाला गेला आणि त्या तरुणीने धावत्या गाडीतून उडी मारली. तिचा मित्र गाडी न थांबवता कराडच्या दिशेने गाडी सुसाट नेऊ लागला. तेवढ्यात मागे उडी मारलेल्या मैत्रिणीने एका कारचालकाला थांबवून त्याच्या गाडीत बसली आणि त्याला सांगितलं की, "एका मुलाने माझी चोरून नेली आणि त्याचा पाठलाग करा." पाठलाग सुरू झाला. त्यातून जीपचालक मित्राने गाडी वेगाने पळवली आणि पुडे पिंपळी पुलावर भयानक अपघात झाला. सध्या पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतलं आहे.
हे ही वाचा : 'आता, वडील रागावतील', या भीतीने 11 वर्षांच्या मुलीने संपवलं स्वतःला; पण 'त्या'दिवशी काय घडलं होतं?
हे ही वाचा : मध्यरात्री उठला, बायकोचा गळा आवळला अन् स्वतःही गळफास घेतला; एका व्यसनाने संसार उद्ध्वस्त झाला!