TRENDING:

1.5 कोटी कर्जाचे आमिष, 23 लाखांची फसवणूक, साताऱ्यातील 'हा' कांड ऐकून तुम्हीही व्हाल चकित!

Last Updated:

Satara Crime : व्यवसायवाढीसाठी 1.5 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली 23.75 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजेंद्र विष्णू काकडे...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Satara Crime : व्यवसायवाढीसाठी 1.5 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली 23.75 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजेंद्र विष्णू काकडे (वय-55, रा. साईनगरी, शाहूनगर, गोडोली, सातारा) याला वाठार पोलिसांनी सहा महिन्यांच्या पाठलागानंतर अखेर अटक केली आहे.
Satara Crime
Satara Crime
advertisement

शंभूराज दिलीप खामकर (रा. करंजखोप, ता. कोरेगाव, सध्या पुणे) यांचा पुण्यात शेअर मार्केट शिकवणीचा क्लास आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना दीड कोटी रुपयांची गरज होती. यासाठी त्यांनी मित्र मयूर धुमाळ यांच्याकडे मदत मागितली. धुमाळ यांनी त्यांना वाठार स्टेशन येथील मनोज कलापट आणि सुरेश निंबाळकर यांच्याशी संपर्क करून दिला.

फसवणुकीचा कट

कलापट आणि निंबाळकर यांनी खामकर यांना राजेंद्र काकडे यांच्या 'जीवनधारा अर्थसाहाय्य प्रायव्हेट लिमिटेड' या खासगी संस्थेत नेले. तिथे काकडे यांनी दीड कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि वेगवेगळ्या कारणांखाली टप्प्याटप्प्याने खामकर यांच्याकडून एकूण 23 लाख 75 हजार रुपये घेतले.

advertisement

अखेर गुन्हा दाखल

इतके पैसे देऊनही कर्ज मिळत नाही, हे लक्षात आल्यावर खामकर यांनी काकडेकडे पैशांसाठी तगादा लावला. तेव्हा काकडेने त्यांना फक्त आठ लाख रुपये परत केले. उर्वरित रक्कम परत न मिळाल्याने खामकर यांनी 17 फेब्रुवारी 2025 रोजी वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर काकडे तब्बल सहा महिने दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसला होता. तो सतत मोबाईल चालू-बंद करत आणि वेगवेगळे नंबर वापरत असल्याने त्याला शोधण्यात अडचणी येत होत्या. अखेर, तो साताऱ्यात परत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाठार पोलीस आणि सातारा शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने 13 सप्टेंबर रोजी त्याच्या गोडोली येथील घरातून त्याला ताब्यात घेतले. कोरेगाव येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

advertisement

हे ही वाचा : रात्री 8 जणांनी घेरलं, एकाने चॉपरने केले सपासप वार, जळगावात रक्तरंजित कांड!

हे ही वाचा : 'सोन्याची विट देतो', म्हणत महिलेला गंडवलं, अंगावरचे सर्व दागिने केले लंपास, साताऱ्यातील अजब प्रकार 

मराठी बातम्या/क्राइम/
1.5 कोटी कर्जाचे आमिष, 23 लाखांची फसवणूक, साताऱ्यातील 'हा' कांड ऐकून तुम्हीही व्हाल चकित!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल