'सोन्याची विट देतो', म्हणत महिलेला गंडवलं, अंगावरचे सर्व दागिने केले लंपास, साताऱ्यातील अजब प्रकार 

Last Updated:

Satara Crime : एका लेंगा-टोपी घातलेल्या 60 वर्षीय व्यक्तीने त्यांना हाक मारली. 'तुमच्या पायाखाली काहीतरी पडले आहे,' असे...

Satara Crime
Satara Crime
Satara Crime : ‘तुम्हाला सोन्याच्या विटा देतो,’ असे सांगून एका 60 वर्षांच्या वृद्धासह दोन भामट्यांनी एका महिलेची 50 हजार रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक केली आहे. साताऱ्यातील मार्केट यार्ड परिसरात 9 ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
सुरेखा मारुती सावंत (वय-57, रा. लिंब, ता. सातारा) या राधिका रस्त्यावरून चालत जात असताना, एका लेंगा-टोपी घातलेल्या 60 वर्षीय व्यक्तीने त्यांना हाक मारली. 'तुमच्या पायाखाली काहीतरी पडले आहे,' असे त्याने सांगितले. सावंत यांनी दुर्लक्ष केले, पण त्यानंतर निळा शर्ट घातलेला अंगाने मजबूत असलेला 40 वर्षांचा एक व्यक्ती तेथे आला. त्याने जमिनीवरून एक रुमाल उचलला.
advertisement
तो रुमाल उघडल्यावर त्यात सोन्याच्या रंगाच्या दोन लहान विटा होत्या. त्यातील एक वीट तुम्हाला देतो, असे त्या दोघांनी सावंत यांना सांगितले. त्या बदल्यात त्यांनी सावंत यांच्याकडील दागिने मागितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, सावंत यांनी आपल्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 4 ग्रॅमचे सोन्याचे मणी, कानातले सोन्याचे फुले, आणि सोन्याचे वेल असे एकूण 9 ग्रॅम वजनाचे दागिने त्यांच्याकडे काढून दिले.
advertisement
दागिने घेतल्यानंतर ते दोघे लगेच निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, सुरेखा सावंत यांनी 13 ऑक्टोबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'सोन्याची विट देतो', म्हणत महिलेला गंडवलं, अंगावरचे सर्व दागिने केले लंपास, साताऱ्यातील अजब प्रकार 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement