जीव सोडला पण साथ नाही, नाशकात प्रेमीयुगुलाने हातात हात घेऊन रेल्वेसमोर मारली उडी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिकच्या जेलरोड-पवारवाडी परिसरात मुंबई-हावडा एक्स्प्रेससमोर उडी घेऊन एका प्रेमी युगुलाने आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नाशिकच्या जेलरोड-पवारवाडी परिसरात मुंबई-हावडा एक्स्प्रेससमोर उडी घेऊन एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी मध्यरात्री दोघांनी हातात हात घेऊन रेल्वेसमोर उडी मारत मृत्यूला कवटाळलं. यातील तरुणाचं वय अंदाजे २५ ते ३० असून तरुणीचं वय २० ते २२ असल्याची माहिती आहे. अशाप्रकारे प्रेमीयुगुलाने जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास मुंबईहून भुसावळकडे जाणाऱ्या मुंबई-हावडा एक्स्प्रेसखाली हे दोघे सापडले. रेल्वेच्या धडकेमुळे दोघांच्याही मृतदेहाचे छिन्नविच्छिन्न झाले. रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या तपासणीत एकाच्या खिशात सिटीलिंक बसचे तिकीट सापडले. या तिकीटाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांच्या तपासानुसार, हे दोघे शुक्रवार, १३ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेजे फाटा येथून बसने निघाले होते. त्यानंतर शनिवारी त्यांनी कारंजाहून नांदूर नाक्यामार्गे नाशिक रोडकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास केला. रात्री ९ च्या सुमारास ते सैलानी बाबा चौकात उतरले आणि त्यानंतर राजराजेश्वरीमार्गे पवारवाडी-एकलहरे गावाजवळील रेल्वेमार्गावर थांबले. त्यानंतर रात्री २ च्या सुमारास त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या केली.
advertisement
या घटनेमागे प्रेमप्रकरण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दोघांनीही हातात हात घालून जीव दिला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अद्याप मृतांची ओळख पटली नाही. पोलीस घटनेचा पुढील तपास करत असून, त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 15, 2025 12:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
जीव सोडला पण साथ नाही, नाशकात प्रेमीयुगुलाने हातात हात घेऊन रेल्वेसमोर मारली उडी