पहिलं प्रकरण 'असं' घडलं
मुंजाजी वरकड हे बँकेच नोकरी करतात. त्यांचा आतेमामा दत्ता भाऊराव ताटे यांचा 'दत्ता रोडलाइन्स'चा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. मुंजाजी वरकड यांचे चुलते राजेभाऊ वरकड यांची ताटे यांच्या ऑफिसमध्ये आरोपी प्रभावती वाघ आणि पांडुरंग साबळे यांच्याशी भेट झाली. चर्चेमधून कळलं की, हे दोघेजण सरकारी नोकरी लावून देण्याचं काम करतात. राजेभाऊंनी आपल्या मुलासाठी म्हणजेच इंद्रजितसाठी सरकारी नोकरीच्या शोधात होते.
advertisement
30 लाख रुपयांत भारती विद्यापीठात 'सहाय्यक प्राध्यापक' पदाची नोकरी लावून देतो, असे या 2 आरोपींना सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून इंद्रजितने 19 लाख आणि दत्ता ताटे यांनी 9 लाख, अशी एकूण 28 लाखांची रक्कम प्रभावती यांच्या खात्यात पाठवली. यावेळी आरोपींनी इंद्रजितला 'सहाय्यक प्राध्यापक' पदाची खोटी नियुक्ती ऑर्डरही दाखवली.
दुसरं प्रकरण 'असं' घडलं
इंद्रजितच्या प्रकरणानंतर मुंजाजी वरकड यांनी 2023 मध्ये आरोपींची भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम विभागात 'सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट'ची सरकारी नोकरी लावून देतो, त्यासाठी 30 लाख रुपये लागतील. मुंजाजीनेही लगेचच 3 लाख रुपये आरोपींच्या खात्यात पाठवले. त्यानंतर आरोपींनी मुंबई मंत्रालयात मुंजाजीला बोलावून घेतले आणि तिथे संतोष कुमार शर्मा यांची भेट घालून दिली. तिथे शर्माने खोट्या नियुक्ती पत्रावर मुंजाजीचीसही करून घेतली आणि उर्वरित 27 लाख दिल्यावर कामावर रुजू करून घेण्याचे आरोपींना आश्वासन दिले. पण, मुंजाजीला शंका आली, त्याने सार्वजनिक बांधकाम विभागात चौकशी तेव्ही नियुक्तीची ती ऑर्डर खोटी असल्याचे निदर्शनास आले.
पुढे काय झालं?
दोन्ही प्रकरणात खोट्या ऑर्डर्स असल्याचे लक्षात आल्यानंतर मुंजाजी, इंद्रजित आणि दत्ता ताटे या तिघांनी आरोपींकडे दिेलेल्या 31 लाख रकमेची मागणी केली. आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. पण नंतर आरोपी प्रभावती यांनी बुलढाण्यातील आईच्या नावावरची जमीन विकून रक्कम देण्याचे आश्वासन दिले. मात्र ती जमीन अगोरदच विकल्याचे समोर आले. यामुळे मुंजाजी वरकड यांनी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात तक्रार केली.
हे ही वाचा : Crime News: पैशांच्या वादाने टोक गाठलं, मित्राला कोयत्याने तोडलं; अंबाजोगाईतील हाॅटेलात घडला थरार!
हे ही वाचा : नियतीचा क्रूर खेळ! आधी वडील, आता आई अन् भाऊही गेला; 14 वर्षांच्या मुलगी झाली अनाथ, पण शेतात नेमकं घडलं काय?