दिनेश सावंत असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्याने धारुर तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीसोबत मैत्री केली होती. नंतरच्या काळात त्याने याच मैत्रीतून मुलीशी जवळीक वाढवली, पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर आरोपीनं पीडितेला स्वत:च्या घरी आणि अंबाजोगाई येथील एका लॉजवर घेऊन जात लैंगिक अत्याचार केला.
नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेसोबत खासगी फोटो काढले. यानंतर संबंधित फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, वारंवार बलात्कार करण्यात आला. १५ डिसेंबर २०२४ ते २७ जून २०२५ या काळात हा प्रकार घडला. तसेच आरोपीनं लग्न करण्यासाठी पीडितेवर दबाव टाकला. लग्न न केल्यास आत्महत्या करेन, अशी धमकीही दिली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सावंतविरोधात गुन्हा नोंद झाला. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
दुसरीकडे, पुण्यातील कोंढवा परिसरात देखील दोन दिवसांपूर्वी अत्याचाराची एक घटना घडली आहे. येथील एका उच्चभ्रू सोसायटीत घुसून नराधमाने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीनं डिलिव्हरी बॉय बनून सोसायटीत प्रवेश केला, यानंतर त्याने पीडितेच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
