यानंतर आता या सगळ्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. याबाबत राजाचा भाऊ विपिन रघुवंशीने वेगळाच दावा केला आहे. ज्यामुळे राजाच्या एका सवयीमुळे तो सोनमच्या जाळ्यात अडकल्याचा अंदाज लावला जात आहे. राजाची एक सवयच त्यासाठी जीवघेणी ठरली. ज्यामुळे सोनमला आणि इतर मारेकऱ्यांना राजा रघुवंशीची हत्या करणं सोपं गेल्याचं सांगितलं जातंय.
advertisement
राजा रघुवंशीचा भाऊ विपिन रघुवंशी सांगितले की, सोनमने राजाच्या कमजोरीचा फायदा घेतला आहे. राजाला नवीन ठिकाणी भेट देणे खूप आवडायचे. त्याला ट्रेकिंगचीही आवड होती. जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळायचा, तेव्हा तो मित्रांबरोबर फिरायला आणि ट्रेकिंगला जायचा. विपिनच्या म्हणण्यानुसार, लग्नापूर्वी राजाने सोनमला प्रवास आणि ट्रेकिंगच्या त्याच्या छंदाबद्दल सांगितले होते. या छंदाचा वापर करून, सोनमने एक भयानक कट रचला आणि राजाला शिलाँगला जाण्यास राजी केले आणि नंतर तिच्या मित्रांच्या मदतीने हा भयानक गुन्हा घडवला.
हवाला व्यवहारात सोनमचं कनेक्शन उघड
दरम्यान, आता सोनम आणि तिचा प्रियकर राज याच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. दोघंही जण एका बेकायदेशीर कामात गुंतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. त्यामुळे एकीकडे राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असताना, आता या प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची एन्ट्री झाली आहे. सोनम आपला प्रियकर राजसोबत हवाला व्यवहारात गुंतल्याचं पोलीस तापासात समोर आलं आहे. याबाबतची कबुली स्वत: राजने दिल्याचं देखील समजत आहे.
हवालासंबंधी पुरावा काय आढळला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुशवाहाच्या मोबाईलवरून हवाला व्यवहारांशी संबंधित काही पुरावे सापडले आहेत. पोलिसांना राजच्या फोनमध्ये दहा रुपयांच्या नोटांचे काही फोटोही सापडले आहेत. या फोटोंचा वापर विशेष कोडवर्ड म्हणून केला जात असल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान राजने कबूल केले की, तो सोनम आणि गोविंदसोबत हवाला पैसे ट्रान्सफर करत असे.