'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार कबीरच्या वैयक्तिक जीवनातही अडचणी होत्या. त्याचा एक वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होते. तो नोएडा येथे नोकरी करत होता. पण पाच महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली. त्यानंतर त्याचे वडील स्वतः नोएडाला जाऊन त्याला मेमारीत घरी परत घेऊन आले.
अर्शद वारसीचा 'शॉट सर्किट';सेबीकडून अभिनेत्यासह पत्नीची शेअर बाजारातून हकालपट्टी
advertisement
मात्र परत आल्यापासून तो सतत आपल्याच विचारांत गढून राहत असे. त्याच्या संगणक आणि मोबाईलमधून जिहादी साहित्य वाचण्याचे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार तो इस्लामी धर्माच्या अपप्रचारक विचारांनी भारलेला होता आणि आपल्या वडिलांकडून वारंवार विचारसुधारणा करण्याचे प्रयत्न होतात म्हणून तो त्यांच्यावर चिडलेला होता.
कबीरच्या वडिलांनी हत्या होण्याच्या आदल्या दिवशीच त्याची बहीण तमन्ना रेहमान (जी हावड्यात शिक्षिका आहे) आणि शेजाऱ्यांना बोलावून कट्टर विचारसरणीपासून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी ही क्रूर घटना घडली.
रशियाने मोठा डाव टाकला, चीनला सोबत घेऊन सुरू आहे खतरनाक गेमप्लान; भारताला...
वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष
कबीरचा विवाह एका भूगोल विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मुलीशी झाला होता. मात्र ती त्याच्या धार्मिक कट्टरतेला विरोध करत होती. तिचे पालक दुबईत काम करत असल्याने तिच्या पाठिंब्याने ती त्याच्यापासून विभक्त झाली. ही घटना कबीरला मानसिकदृष्ट्या खूप जड गेली. घटस्फोटानंतर त्याने स्वतःला अधिकच अतिरेकी विचारांत गुंतवून घेतले.
पोलिस तपासात असेही समोर आले आहे की कबीरने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून छुरे खरेदी केली होती. जी त्याने दोन्ही ठिकाणी हल्ल्यासाठी वापरली. स्थानिक लोकांनी सांगितले की, हल्ल्याच्या आदल्या दिवशी तो त्या चाकूसह परिसरात फिरताना दिसला होता. बोंगावन येथील हफिजिया खरिजिया अनाथाश्रम-मदरसात कबीरने हल्ला केला. हे ठिकाण भारत-बांगलादेश सीमेजवळ अवघ्या ६ किमी अंतरावर आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बोंगावन स्थानकात उतरल्यावर त्याने सरळ सीमा कुठे आहे याची चौकशी केली होती, ज्यावरून त्याचा पलायनाचा हेतू स्पष्ट होतो.
कबीरचे वादग्रस्त वक्तव्य
पोलिसांनी सांगितले की, कबीर वारंवार 'मला जन्नत मिळेल' असं म्हणत होता. त्याचा दावा होता की, त्याचे आईवडील गरीबांशी वाईट वागायचे. जे इस्लामच्या विरोधात आहे. मात्र पोलिसांच्या मते ही कारणे वरवरची होती. खरी चीड त्याला आईवडिलांच्या सुधारण्याच्या प्रयत्नांमुळे होती. त्याचा असा ठाम विश्वास होता की त्याचे पालक इस्लामचे योग्य पालन करत नाहीत.
बोंगावन न्यायालयाने कबीरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.विशेष सरकारी वकील समीर दास यांनी सांगितले की, त्याचे अतिरेकी संघटनांशी संबंध आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांना वेळ लागणार आहे.
कबीरची चौकशी सुरू असून. वेगवेगळ्या स्रोतांकडून माहिती गोळा केली जात आहे. चौकशीदरम्यान मिळालेल्या तपशीलांची खातरजमा केली जाईल, असे पूर्व बर्धमान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सायक दास यांनी सांगितले. ही घटना केवळ कौटुंबिक हत्या नसून अतिरेकी विचारसरणीच्या आहारी गेलेल्या युवकाचा समाजावर झालेला गंभीर परिणाम दर्शवते. याप्रकरणात पुढे अजून धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.