गोपालगंजमध्ये हुंड्यात बुलेटची मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्यांनी सुनेची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हत्येनंतर मृतदेहाचे अनेक तुकडे करून त्यांनी गंडक नदीत फेकून दिल्याचा आरोप आहे. पोलिसांना गंडक नदीच्या पात्रातून महिलेची चप्पल सापडली आहे. ही घटना विशंभरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील विशंभरपूर गावात घडली. 20 वर्षीय ज्योतीदेवी असे मृत महिलेचे नाव असून, ती विशंभरपूर गावातील रहिवासी मिंटू कुमार याची पत्नी होती.
advertisement
Crime : पैशांसाठी पाकिस्तानला पुरवायचा नौदलाची माहिती, प्रशिक्षणार्थीला मुंबईत अटक
यूपीच्या कुशीनगर जिल्ह्यातील तरेया सुजान पोलीस स्टेशन परिसरातील वाघाचौर गावातील रहिवासी ब्रह्मा सिंह यांनी आरोप केला आहे की त्यांची मुलगी ज्योती देवी हिचं लग्न 6 जून रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार झालं होतं. लग्नानंतर सासरच्यांनी हुंडा म्हणून बाईकची मागणी केली होती. पण ही मागणी पूर्ण न झाल्याने महिलेचा पती मिंटू कुमार व सासरची मंडळी अरविंद प्रसाद, मिता कुंवर यांनी तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. तसेच तिचा छळही केला.
छळाला विरोध केल्यावर 10 डिसेंबर रोजी सासरच्या लोकांनी ज्योतीदेवीची हत्या केली आणि तिचा मृतदेह गंडक नदीत फेकून दिला. या प्रकरणाची माहिती मिळताच ज्योतीदेवीचे वडील 11 डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी याबाबत माहिती घेतली. नंतर 12 डिसेंबर रोजी त्यांनी मुलीच्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस पोहोचले असता सर्व आरोपी त्यांच्या राहत्या घरातून फरार असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी एसडीआरएफच्या मदतीने गंडक नदीत शोधमोहीम राबवली, मात्र ज्योतीदेवीचा मृतदेह सापडू शकलेला नाही. तिचा मृतदेह नदीत शोधण्याचं काम चालू आहे.
