TRENDING:

लग्नाची पहिली रात्र, बेडरूममध्ये लावला हिडन कॅमेरा, दुबईतल्या मित्रांना Video पाठवून नराधम पती पळाला

Last Updated:

लग्नाच्या पहिल्या रात्री पतीने पत्नीसोबतच्या प्रायव्हेट क्षणांचे व्हिडिओ बनवले आणि त्याने हे व्हिडिओ दुबईमधील त्याच्या मित्रांना पाठवले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लग्नाच्या पहिल्या रात्री पतीने पत्नीसोबतच्या प्रायव्हेट क्षणांचे व्हिडिओ बनवले आणि त्याने हे व्हिडिओ दुबईमधील त्याच्या मित्रांना पाठवले. एवढं करूनही महिलेचा पती समाधानी झाला नाही, म्हणून त्यानंतरही त्याने धक्कादायक कृत्य केलं आहे. साखरपुड्याच्या 2 महिन्यांनंतर डिसेंबर 2024 मध्ये महिलेने सय्यद इनामुल हकसोबत लग्न केलं.
लग्नाची पहिली रात्र, बेडरूममध्ये लावला हिडन कॅमेरा, दुबईतल्या मित्रांना Video पाठवून नराधम पती पळाला (AI Image)
लग्नाची पहिली रात्र, बेडरूममध्ये लावला हिडन कॅमेरा, दुबईतल्या मित्रांना Video पाठवून नराधम पती पळाला (AI Image)
advertisement

19 महिलांसोबत संबंध

लग्नाच्या तयारीचा भाग म्हणून 340 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक यामाहा बाईक देण्यात आली, पण लग्नानंतर पीडित महिलेला सय्यदचं आधीच लग्न झालेलं आहे, हे समजलं. एवढंच नाही तर सय्यदने महिलेला तू माझी दुसरी पत्नी असून आपले इतर 19 महिलांसोबत अनैतिक संबध असल्याचंही सांगितलं. कर्नाटकच्या बंगळुरूजवळील पुट्टेनहल्ली भागामध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे.

advertisement

लग्नाच्या रात्रीचा व्हिडिओ

सय्यदने लग्नाच्या पहिल्या रात्री बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले होते, यातून त्याने बेडरूममधले खासगी क्षणांचे काही व्हिडिओदेखील बनवले, यानंतर त्याने हे व्हिडिओ दुबईमधील त्याच्या मित्रांना पाठवले. तसंच सय्यदने आपल्या मित्रांसोबत संबंध ठेवायला भाग पाडले, असा खळबळजनक आरोप पीडित महिलेने केला आहे. महिलेच्या या आरोपानंतर पोलिसांनी सय्यदविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

एवढं सगळं होऊनही सय्यदचं समाधान झालं नाही आणि त्याने भारताबाहेरील मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. आपण जेव्हा याला विरोध केला तेव्हा त्याने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

घटस्फोटाची धमकी

'जेव्हा मला हे कळले तेव्हा माझे सय्यदशी भांडण झाले. त्यानंतर त्याने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याने मला इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. तो उघडपणे सांगायचा की त्याचे 19 महिलांसोबत अवैध संबंध आहेत. तू माझे काहीही करू शकत नाही. जेव्हा मी माझ्या कुटुंबाला याबद्दल सांगितले तेव्हा ते मला भेटायला आले. पण माझ्या पतीने मला त्यांना भेटू दिले नाही आणि घटस्फोटाची धमकी देऊ लागला', असं पीडित महिला म्हणाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात इथं मिळते प्रसिद्ध लेमन टी, चव अशी की एकदा प्याल तर पुन्हा याल
सर्व पहा

अखेर, कंटाळून, पीडितेने पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. सय्यद सध्या फरार असून पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या/क्राइम/
लग्नाची पहिली रात्र, बेडरूममध्ये लावला हिडन कॅमेरा, दुबईतल्या मित्रांना Video पाठवून नराधम पती पळाला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल