कोरबा, 31 जुलै : नवविवाहित दाम्पत्याला मूल होण्यासाठी मांत्रिकाची मदत घेणे चांगलेच महागात पडली. मांत्रिकाने दिलेली औषधी खाल्ल्याने पती-पत्नीची तब्येत खराब झाली. यानंतर ते सातत्याने उल्टी करू लागले. यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, याठिकाणी रात्री उशिरा नवविवाहित महिलेचा मृत्यू झाला.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
उरगा ठाणे अंतर्गत बरबसपुर गावातील दाम्पत्यासोबत ही घटना घडली. या गावातील रहिवासी असलेल्या रामाधार पटेलचे चांपा येथील रहिवासी सुशिला पटेल सोबत लग्न झाले होते. यानंतर रामाधार आणि त्याची पत्नी नातेवाईकांसह राहत होते. दरम्यान, त्यांच्या लग्नाला एक वर्ष झाले होते. मात्र, संतती नसल्याने ते निराश होते. त्यांनी संततीप्राप्ती साठी उपचार केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. यामुळे मग त्यांनी मांत्रिकाची मदत घेण्याचे ठरवले.
advertisement
यानंतर या दाम्पत्याने जोगियाडेरा येथे राहणाऱ्या रामदेव यादव या मांत्रिकाची मदत घेतली. मृत सुशिला हिची मोठी बहीण सीतामढी येथे राहते. तिची तब्येत मागील काही दिवसांपासून खराब आहे.
शनिवारी सकाळी रामाधार आणि त्याची पत्नी सीतामढी येथे राहणाऱ्या बहिणीच्या गावी जाण्याच्या बहाण्याने निघाले. इथून रामाधार आपली पत्नी सुशिला आणि सासरा फुल सिंह याच्यासोबत मांत्रिकाच्या घरी गेले. याठिकाणी मात्रिकांने तब्बल 1 तास भूतविद्या केली. त्यानंतर त्याने या दाम्पत्याला काही खायला दिले. ते खाताच विवाहितेला उलटी होऊ लागली. यानंतर त्याने काहीतरी उत्तर देऊन या पती-पत्नीला शांत केले.
यावेळी फुलसिंह आणि रामाधार तिला घेऊन घरी जात होते. याचदरम्यान, सुशिलाची तब्येत बिघडली. तर रामाधार यालाही उलटी होऊ लागली. त्यामुळे दोघांना सुनालिया पुल येथील एका रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास या नवविवाहितेने अखेरचा श्वास घेतला. तर दुसरीकडे तिच्या पतीवर अजून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मांत्रिक रामलाल यादव याने तीन पान तयार केले होते. यामध्ये काही मसाला आणि काहीप्रकारची जडीबुटी होती. त्याने भूतविद्येआधी या पती पत्नीला नळाखाली अंघोळ करायला सांगितली होती. तसेच त्यांना नवीन कपडे घातले गेले. यानंतर भूतविद्येनंतर त्यांना ते पान दिले. ते पान खोलून पाहिल्यावर त्यांना त्यात जडीबुटी दिसली. अंधविश्वासामुळे या महिलेला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणातील मांत्रिक फरार असून महिलेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
