मिळालेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय आरोपी तरुण हा उच्चशिक्षित असून तो भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी खरगपूर इथं शिक्षण घेत आहे. तो ठाणे जिल्ह्यातील कळवा परिसरात वास्तव्याला आहे. गुरुवारी त्याने शेजारील १३ वर्षीय दिव्यांग मुलीला नवीन कपडे दिले. यानंतर तिला फूस लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
तिने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अर्थात पोक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत नराधम आरोपीला अटक केली आहे. एका उच्च शिक्षित तरुणाने अशाप्रकारे शेजारी राहणाऱ्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी आरोपीचा मोबाइल फोन तपासला असता, त्याच्या फोनमध्ये इतर काही मुलींचे खासगी फोटो आणि व्हिडीओ आढळून आले आहेत. त्यामुळे आरोपीने त्यांचाही अशाच प्रकारे छळ केला का? याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
