दारूच्या दुकानात झाली मैत्री
तांदळी गावातील बाबाराव बालाजी मथे हे आपल्या कुटुंबासह तेलंगणा राज्यात कामासाठी राहत होते. 10 ऑगस्ट रोजी कुटुंबाला घेऊन ते गावी आले. 11 ऑगस्ट रोजी मुखेड बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी केला. त्यानंतर ते दारुच्या अड्ड्यावर गेले. तिथे त्यांना बालाजी वर्धमान भालेराव (वय-25. रा. कुंद्राळा) भेटला. दोघांच्या संवाद झाला, पुढे थोड्याच वेळात मैत्री झाली.
advertisement
शेतात गेले दोघे दारू प्यायला
पुढे दारू घेऊन एका पडीक शेतात दारु पिण्यासाठी गेले. दारू पित असत्ना त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद टोकाला गेला. त्यामुळे बालाजी भालेरावने सरळ दगड उचलला आणि बाबाराव मथेच्या डोक्यात घातला. त्यामुळे बाबाराव खाली पडला. याचा फायदा घेत बालाजीने भलामोठा दगड घेऊन डोकं ठेचायला सुरू केलं. त्यातच बाबारावचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बालाजी पसार झाला.
48 तासात पोलिसांनी आरोपीला केली अटक
शेतात मृतदेह पडल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. आरोपीच्या शोधासाठी तपास पथकं रवाना झाली. शोध सुरू असताना पोलिसांना कळलं की, आरोपी उद्गीरमधील एका व्यसनमुक्ती केंद्रात लपून बसला आहे. 14 ऑगस्ट रोजी पोलिसांना उद्गीर गाठलं आणि त्याला ताब्यात घेतलं. अवघ्या 48 तासांत पोलिसांना आरोपीला पकडल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
हे ही वाचा : Satara News: 'लिंक ओपन केली अन्...', गटशिक्षणाधिकाऱ्याची उडाली झोप, लागला 'इतक्या' लाखांचा चुना!
हे ही वाचा : 'या' लाॅजवर सुरू होतं भलतंच; पोलिसांना मिळाली टीप अन्... खंडाळ्यातून समोर आला 'मोठा कांड'