TRENDING:

जळगाव हादरलं! मुलगा बर्थडे पार्टीला गेला अन् मागे घडलं आक्रीत, 85 वर्षीय आईसोबत अमानुष कांड

Last Updated:

Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यात अमानुषतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. इथं एका 85वर्षीय महिलेची अज्ञाताने निर्घृण हत्या केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यात अमानुषतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. इथं एका ८५ वर्षीय महिलेची अज्ञाताने निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं लोखंडी रॉड डोक्यात घालून महिलेची हत्या केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेच्या कानातील दागिने ओरडून गेले आहेत. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
News18
News18
advertisement

जनाबाई पाटील असं हत्या झालेल्या ८५ वर्षीय महिलेचं नाव आहे. त्या जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे आपल्या मुलासोबत वास्तव्याला होत्या. गुरुवारी रात्री त्यांची लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याच्या बाळ्या असा एकूण तीन तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून पलायन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी जनाबाई यांचे पुत्र कृष्णराव पाटील हे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी पाचोऱ्याला गेले होते. ते वाढदिवसाला गेले असता मागे त्यांच्या आईसोबत आक्रीत घडलं. ज्यावेळी ते घरी परतले, तेव्हा त्यांना आई मृतावस्थेत आढळल्या. आईची हत्या झाल्याचं लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. डॉग स्क्वॉडसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

पोलिसांनी श्वानाच्या मदतीने तपास सुरू केला. मात्र श्वान गावातच फिरलं. यामुळे आरोपी मारेकरी गावातीलच असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे शेवाळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपीला अटक करू असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
जळगाव हादरलं! मुलगा बर्थडे पार्टीला गेला अन् मागे घडलं आक्रीत, 85 वर्षीय आईसोबत अमानुष कांड
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल