जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सुपडू भादू पाटील विद्या मंदिर शाळेतील शिक्षक रवींद्र महाले यांनी मंगळवारी दुपारी शाळेच्या वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडली त्यावेळी शाळेमध्ये मधली सुट्टी सुरु होती. त्यावेळी विद्यार्थी प्रांगणात जेवणात व्यस्त होते. मात्र, मधली सुट्टी संपल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर
advertisement
या घटनेने संपूर्ण शाळा, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पाचोरा शहरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रवींद्र महाले यांचा मृतदेह ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. शिक्षकाच्या वैयक्तिक आयुष्यातील कोणतेही ताणतणाव, मानसिक स्वास्थ्य, आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणी होत्या का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पोलीस बापाच्या कृत्याने नाशिक हादरलं, 6 वर्षांच्या लेकीचा नायलॉन दोरीने गळा आवळला
नाशिकमधून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका पोलीस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः सुद्धा आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या जेलरोड मॉडेल कॉलनी इथं घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या जेलरोड मॉडेल कॉलनीमध्ये मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. जेलरोड भागातील मॉडेल कॉलनी योगमाला अपार्टमेंटमध्ये उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई स्वप्निल दीपक गायकवाड (वय 36) हे आपल्या सहा वर्षीय भैरवी गायकवाड या चिमुरडीसह राहत होते. संध्याकाळच्या सुमारास स्वप्निल गायकवाड यांनी भैरवीला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास देऊन तिची हत्या केली. त्यानंतर पंख्याला दोरी बांधून स्वतःचं आयुष्य संपवलं.
