परंतु टवाळखोर तरुणांनी जळगाव कांचन नगरातील सदगुरू किराणा चौकात लावलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. पण अशाप्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे फोडणे दोन तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांनी दोन्ही तरुणांचा शोध घेऊन, ज्या परिसरातील त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, त्याच परिसरात त्यांची धिंड काढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हेगारीवर आळा बसावा म्हणून जळगाव पोलिसांनी शहरातील सदगुरू किराणा चौकात हे कॅमेरे बसवले होते. मात्र संजय सौदागर आणि गोविंदा बाविस्कर या दोन टवाळखोर तरुणांनी काहीही कारण नसताना हे सीसीटीव्ही कॅमेरे फोडले. यावेळी कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रीकरणाच्या माध्यमातून पोलिसांनी कॅमेरा तोडणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला शनिपेठ पोलिसांनी खाक्या दाखवत त्यांची वरात काढली.
advertisement
गुन्हेगारीवर आळा बसावा याच उद्देशाने पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतलं, त्यांची अर्ध नग्न वरात काढण्यात आली. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याशी छेडछाड केल्यास इतरांनाही असाच धडा शिकवला जाईल, असा संदेश पोलिसांनी दिला. हा धिंड काढल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
