TRENDING:

महिलेचा खून करून पळत होते बाप-लेक, पण वाटतेच झाला भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दुसरा ताब्यात

Last Updated:

रविवारी पहाटे जिंतूर तालुक्यातील वस्सा येथे प्रेमसंबंधातून एका महिलेचा खून झालेला होता. या प्रकरणात बाप-लेक संशयित आरोपी होती. घटनेनंतर...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जिंतूर (परभणी) : रविवारी पहाटे जिंतूर तालुक्यातील वस्सा येथे प्रेमसंबंधातून एका महिलेचा खून झालेला होता. या प्रकरणात बाप-लेक संशयित आरोपी होती. घटनेनंतर दोघेजण फरार होण्याच्या तयारी होते. मात्र वाटतेच त्यांचा अपघात झाला. त्यात मुलाचा मृत्यू झाला तर बापाला पोलिसांनी अटक केली.
Crime News
Crime News
advertisement

मुख्य आरोपींचा वाटेत झाला अपघात

या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, वस्सा ते आडगावफाटा येथे शेतात सखुबाई कुंदन सोनवणे (वय-35) यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोप लखन आव्हाड आणि त्याचे वडील संतोष आव्हाड घटनेनंतर मोटारसायकलीवरून पसार होणार होता. मात्र, वसमत फाट्याजवळ त्यांचा मोठा अपघात झाला, अशी परिसरात चर्चा होती.

advertisement

वडिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

या अपघातात जखमी झालेल्या दोघांना नांदेड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पोलिसांची निगराणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेला लखन आव्हाड याचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आलेली आहे. पोलिसांनी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा : निळ्या ड्रममध्ये पतीचा मृतदेह, बॉडीवर टाकलं मीठ, पत्नी अन् घरमालकाचा मुलगा फरार

advertisement

हे ही वाचा : अचानक-भयानक! मध्यरात्री 'त्या' लॉजवर पडली पोलिसांची धाड, उडाला गोंधळ आणि नको त्या अवस्थेत...

मराठी बातम्या/क्राइम/
महिलेचा खून करून पळत होते बाप-लेक, पण वाटतेच झाला भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दुसरा ताब्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल