घटनेची सविस्तर माहिती
ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जानवली येथे घडली. उत्तरप्रदेश येथील मूळ रहिवासी असलेले कल्लू निसाद (वय-26), प्रेमचंद निसाद (वय-35), संतराम निसाद (वय-38) आणि पवन निसाद (वय-35) हे चार तरुण जानवली येथे एकत्र राहतात. हे सर्व जण पुठ्ठा गोळा करून व्यापाऱ्यांकडे विकण्याचे काम करतात.
घरातील सर्व कामे एकमेकांनी वाटून घेतली होती. मंगळवारी सकाळी 9 वाजता ज्याचा भांडी धुणे आणि घराची साफसफाई करण्याचा नंबर होता, त्याची कामे करायला सांगून कल्लून पुठ्ठा गोळा करण्यासाठी निघून गेला. रात्री साडेनऊ वाजता तो घरी परतल्यावर, भांडी धुतलेली नाहीत आणि घराची साफसफाईही झालेली नाही हे त्याच्या लक्षात आले. यावरून कल्लू आणि त्याचे तिन्ही साथीदार प्रेमचंद, संतराम आणि पवन यांच्यात वाद सुरू झाला.
advertisement
ब्लेडने हल्ला
या भांडणात प्रेमचंद निसाद आणि कल्लू यांच्यात बाचाबाची वाढली. प्रेमचंदने कल्लूच्या शर्टची कॉलर पकडून त्याला हाताने गालावर आणि डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर पवन निसादमे ब्लेड काढले. त्याने ब्लेडचा एक तुकडा स्वतःकडे ठेवला आणि दुसरा तुकडा संतरामला दिला. पवनने कल्लूच्या उजव्या गालावर ब्लेडने वार करून त्याला जखमी केले, तर संतरामने कल्लूच्या डाव्या हातावर वार करून जखमी केले.
पोलिसांची कारवाई
जखमी कल्लूला त्याच्या नातेवाईकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा कल्लूने कणकवली पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाईल. एक आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा : लघुशंकेसाठी उतरला अन्..! दबा धरून बसलेल्या चोरट्यांचा कुरियर बाॅयवर हल्ला; 70 लाखांचं सोनं केलं लंपास
हे ही वाचा : Satara News: "कोणालाही सांगू नकोस!", मित्राकडून अत्याचार, अल्पवयीन मैत्रीण 8 महिन्यांची गरोदर!