एका लाल रंगाच्या लॅम्बोर्गिनीने कामगारांना धडक दिल्यानंतर सेफ्टी हेल्मेट आणि केशरी जॅकेट घातलेले कामगार लक्झरी कारकडे धावत गेले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ मोबाईलवर शुट केला. कामगारांनी गाडीचा दरवाजा उघडला. व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीने चालकाला विचारले की, तुम्ही बरेच स्टंट शिकला आहात का? तुम्हाला माहिती आहे का इथे किती लोक मेले आहेत? ज्यावर ड्रायव्हरने सहज उत्तर दिले, "कोणी मेले का?"
advertisement
शाळेजवळ लॉक केलेल्या स्विफ्ट कारमध्ये सापडला मृतदेह; दरवाजा ओपन करताच...
घटनास्थळी गोंधळ झाल्यानंतर, ड्रायव्हर त्याच्या लक्झरी कारमधून बाहेर पडला आणि संपूर्ण घटना रेकॉर्ड करणारा माणूस, 'पोलिसांना बोलवा, पोलिसांना बोलवा', असे म्हणताना दिसतो. ज्यावर ड्रायव्हर म्हणाला, मी हळूवारपणे अॅक्सिलरेटर दाबला. "तुम्ही हळूवारपणे दाबला का?" त्या माणसाने उत्तर दिले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे. ज्या गाडीने कामगारांना धडक दिली त्याच्या नंबर प्लेटवरून गाडी पुद्दुचेरीमध्ये नोंदणीकृत असल्याचे दिसते. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे आणि गाडी जप्त केली आहे.