Crime News: शाळेजवळ लॉक केलेल्या स्विफ्ट कारमध्ये सापडला मृतदेह; दरवाजा ओपन करताच संपूर्ण जिल्हा हादरला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
देऊळगाव राजा येथे पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांचा मृतदेह स्विफ्ट गाडीत आढळला. हत्या की अपघात याबाबत तपास सुरू असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
बुलढाणा: जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, देऊळगाव राजा येथे एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह त्याच्या स्वतःच्या स्विफ्ट गाडीत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव ज्ञानेश्वर म्हस्के (वय 35) असून, ते गिरोली खुर्द येथील रहिवासी होते. ज्ञानेश्वर म्हस्के हे जालना जिल्ह्यात हायवे पोलिस विभागात कार्यरत होते.
ही घटना देऊळगाव राजा – सिंदखेड राजा मार्गावरील आर. जे. इंटरनॅशनल स्कूलजवळील वनविभागाच्या जागेत घडली. पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हत्या की अपघात?
प्राथमिक तपासात म्हस्के यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह स्वतःच्या गाडीतच आढळल्याने, ही आत्महत्या नसून हत्या असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला असून, हा घातपात होता का, याचा शोध घेतला जात आहे. मृत्यूमागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 30, 2025 6:43 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: शाळेजवळ लॉक केलेल्या स्विफ्ट कारमध्ये सापडला मृतदेह; दरवाजा ओपन करताच संपूर्ण जिल्हा हादरला