TRENDING:

नोकरी लावतो म्हणून सांगितलं अन् लॉजवर नेलं, 23 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं, लातुरात खळबळ

Last Updated:

Latur News: या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लातूर: नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून 23 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूरमधील तरुणीच्या तक्रारीनंतर उदगीर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संतोष दत्तात्रय पाटील असे आरोपीचे नाव असून या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
नोकरी लावतो म्हणून सांगितलं अन् लॉजवर नेलं, 23 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं, लातूरला खळबळ
नोकरी लावतो म्हणून सांगितलं अन् लॉजवर नेलं, 23 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं, लातूरला खळबळ
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बारावी उत्तीर्ण असून तिने आयटीआयपर्यंत शिक्षण घेतले आहे. नोकरीच्या शोधात असताना तिच्या घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने तिला नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. त्याच विश्वासावरून 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास त्या व्यक्तीने तिला शहरातील बिदर रोड परिसरातील एका लॉजवर नेले.

मामा कसला, हा तर शैतान, बहिणीला भेटायला आला अन् गरोदर सूनेवरच..., कोर्टानं घवडवली जन्माची अद्दल!

advertisement

आरोपीने तिथे गेल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, ही घटना कुणालाही सांगितल्यास तिचा आणि तिच्या आजीचा जीव घेण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या धमकीमुळे काही काळ तरुणीने ही बाब उघड केली नाही.

दरम्यान, 27 फेब्रुवारी रोजी दुपारी पीडित तरुणी तिच्या आजीकडे असताना आरोपी पुन्हा त्या ठिकाणी आला. त्यावेळी त्याने तिच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि पुन्हा धमकी दिल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
छ. संभाजीनगरमधील ऐतिहासिक मंदिर, थेट संत एकनाथ महाराजांशी कनेक्शन, पाहा Video
सर्व पहा

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे संतोष दत्तात्रय पाटील या आरोपीविरुद्ध उदगीर शहर पोलिस ठाण्यात उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
नोकरी लावतो म्हणून सांगितलं अन् लॉजवर नेलं, 23 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं, लातुरात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल