शिवम यादव, सत्यम मांगले, गणेश यादव, राजाभाऊ यादव आणि ईश्वर यादव असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणांची नावं आहेत. तर शिवम चिकणे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मयत शिवम हा माजलगाव इथं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. प्रेम प्रकरणातून मुलीच्या भावाने त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील गंगावाडी गावात घडली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मयत शिवम चिकणे याचं आपल्या गावातील एका मित्राच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. मागील काही दिवसांपासून हे प्रकरण सुरू होतं. पण अलीकडेच मुलीच्या भावाला दोघांमधील प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. यामुळे संतापलेल्या आरोपीनं आपल्याच मित्राचा काटा काढायचं ठरवलं. त्याने आपल्या इतर चार साथीदाराच्या मदतीने शिवमला मारहाण करण्याचा कट रचला.
मुलीच्या भावाने इतर चार जणांना सोबत घेत शुक्रवारी शिवम चिकणे याला बेदम मारहाण केली. यात शिवम गंभीर जखमी झाला. यामुळे त्याला सुरुवातील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला संभाजीनगरला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यानंतर त्याला संभाजीनगरला घेऊन जाताना वाटेतच शिवमने अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणी मयताचे वडील काशिनाथ चिकणे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
