पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद रोत याने 27 सप्टेंबरच्या रात्री त्याची 30 वर्षांची पत्नी चेतनाची हत्या केली. हत्येनंतर त्याने 29 सप्टेंबर रोजी त्याच्या दुकानाच्या तळघरात मृतदेह पुरला. हे रहस्य त्याने 6 दिवस लपवून ठेवलं, पण 2 ऑक्टोबर रोजी त्याने पोलीस स्टेशनला जाऊन पत्नीची हत्या केल्याचं सांगितलं, यानंतर पोलिसांनी अरविंदला ताब्यात घेतलं. अरविंदच्या माहितीवरून पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली.
advertisement
चेतनाच्या माहेरची घरी आले
घटनेची माहिती मिळताच मृत चेतनाच्या माहेरचे लोक घटनास्थळी पोहोचले. यानंतर मृतदेह बाहेर काढण्याबाबत चेतनाच्या माहेरचे आणि सासरच्यांमध्ये वाद झाले. हे वाद अनेक तास सुरू होते, पण पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी मात्र शांत बघत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस उपअधीक्षक राजकुमार राजोरा यांच्यासह चार पोलीस ठाण्यांचा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला.
चेतनाच्या मर्डरची मिस्ट्री कायम
संध्याकाळी वादावर तोडगा निघाल्यानंतर पोलिसांनी चेतनाचा मृतदेह बाहेर काढला, त्यानंतर हा मृतदेह डुंगरपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात नेण्यात आला. हत्येमागील खरं कारण उलगडण्यासाठी पोलीस सध्या आरोपी अरविंद रौतची चौकशी करत आहेत.
काय म्हणाले पोलीस?
सिमलवाडा येथील उपअधीक्षक राजकुमार राजोरा यांनी सांगितले की, आरोपी पतीने हा गंभीर गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची चूक उघड झाली. घटनेचा तपास सुरू आहे आणि आरोपीकडून संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे.