राजाच्या फोनवरून पोस्ट
सोनम रघुवंशी तिचा प्रियकर राज कुशवाहाच्या प्रेमात इतकी वेडी होती की तिने तिच्या डोळ्यासमोर भाडोत्री मारेकऱ्यांकडून तिच्या पतीची हत्या करून टाकली. इतकंच नाही तर तिने त्याची सोन्याची चेन, अंगठी आणि ब्रेसलेटही हिसकावून घेतलं. मरण्यापूर्वी राजाने हल्लेखोरांशीही लढा दिला. एवढंच नाही तर हत्येनंतर सोनमने तिचा पती राजाच्या फोनवरून एक पोस्ट देखील केली, ज्यामध्ये तिने लिहिले की आपण सात जन्म एकत्र आहोत.
advertisement
23 मे रोजी राजाची हत्या
राजाला सोनमने डोळ्यांसमोर खड्ड्यात पडताना पाहिलं. त्यानंतर तिने राजाच्या फोनवरून "साथ जन्मों का साथ है" अशी पोस्ट केली. 23 मे रोजी राजाची हत्या झाली. त्याच दिवशी सोनम आणि राजाच्या बेपत्ता होण्याची बातमीही आली. सोनमने 10 मे रोजी दुपारी 2:15 वाजता राजाच्या फोनवरून पोस्ट केल्याचे सांगितलं जात आहे.
मुख्य सूत्रधार सोनम मेघालयात
दरम्यान, राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार सोनम मेघालयात पोहोचली आहे. मेघालय पोलिसांनी सोनम रघुवंशीला पहाटे 1.30 वाजता शिलाँग सदर पोलिस ठाण्यात आणले. तिथे तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. मेघालय पोलिसांनी तिचा तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड घेतला आहे. आता मेघालय पोलिस सोनम आणि राज कुशवाहा यांच्यासह इतर आरोपी विशाल चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांना बुधवारी शिलाँग न्यायालयात हजर करणार आहेत.