नांदेडच्या माहूर तालुक्यातील आसोली येथील प्रथमेश पुरी हा 18 वर्षीय विद्यार्थी नांदेड मध्ये नीट परीक्षेची तयारी करत आहे. शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमध्ये तो राहत होता. दरम्यान 5 जानेवारी आकाश सावंत हा पोलिस कर्मचारी त्यांच्या रूमवर आला.त्याच्यासोबत क्षितिज कांबळे आणि श्रावण हे अन्य दोन तरुण आले होते.
यावेळी मोटारसायकल आणि सोन्याची चेन चोरी केल्याचा आरोप करत तिघांनी प्रथमेश याला बाहेर नेले होते. अशोक नगर , गोकुळनगर , आसना नदी परिसरात नेऊन त्याला बेदम मारहाण करण्यात आली. नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस कर्मचारी आकाश सावंत हॉस्टेलवर आला आणि पुन्हा प्रथमेश याच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून त्याला काठीने जबर मारहाण करण्यात आली होती.
advertisement
दरम्यान या घटनेने घाबरलेल्या मुलाने काही दिवस हा घडलेला प्रकार कोणालाच सांगितला नाही. नंतर त्याच्या वडिलांना हा संपूर्ण प्रकार कळाला. त्यानंतर त्यांनी भाग्यनंगर पोलिस ठाण्यात जाऊन पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीवरून पोलीस कर्मचारी आकाश सावंतवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सावंत पोलीस कर्मचारी आहे.नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात याची नेमणूक आहे. या मारहाणींनतर पोलिसांनी आकाश सावंतचे निलंबन देखील केले आहे.