या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. म्हमाजी आसबे, पत्नी मोनाली आसबे, मुलगी ऐश्वर्या आणि मुलगा कार्तिक असं मृत पावलेल्या चौघांची नावं आहेत. एकाच कुटुंबीयातील चार जणांचा अशाप्रकारे अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पती म्हमाजी आणि पत्नी मोनाली यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मोनाली यांनी रागाच्या भरात मुलगी ऐश्वर्या आणि मुलगा कार्तिक यांना सोबत घेऊन घराजवळील विहिरीत उडी मारली. या घटनेत तिघांचाही नाकातोंडात पाणी जाऊन मृत्यू झाला.
advertisement
ही घटनेची माहिती मिळताच पती म्हमाजी आसबे यांनीही आज सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरगुती कारणातून झालेल्या वादामुळे अवघ्या चोवीस तासात अख्खं कुटुंब संपवलं आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. तसेच नातेवाईकांमधून हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेची नोंद पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
