निलेश शिंदे, शुभम पोखरकर आणि सुमित शिंदे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. तर सोहम सचिन शिंदे असं हत्या झालेल्या १७ वर्षीय मुलाचं नाव आहे. आरोपींनी जुन्या भांडणा कारणातून ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री साडे दहा वाजता सोहम आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी घटना स्थळी आलेल्या आरोपींनी सोहमची निर्घृण हत्या केली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सोहम हा घटनेच्या वेळी दिघी वरमुखवाडी येथील केकीज या केकच्या दुकानासमोर मित्रांशी गप्पा मारत बसला होता. यावेळी अचानक दुचाकीवर काहीजण तिथे आले. त्यांनी एक वर्षापूर्वी झालेल्या वादातून सोहमला शिवीगाळ करत कोयत्याने वार केले. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता विरोधी पथकाने तातडीने तपासाची चक्र फिरवत तिघांना बेड्या ठोकल्या. निलेश शिंदे , शुभम पोखरकर , सुमित शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.