सोशल मीडिया पोस्टमुळे फुटले बिंग
या प्रकरणाचा छडा एका सोशल मीडिया पोस्टमुळे लागला. साताऱ्यातील दोन तरुणांनी दोन किंग कोब्रासोबतचे आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे फोटो वनविभागाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सखोल तपास सुरू केला. तपासात असे उघड झाले की, या चौघांनी मिळून दुर्मिळ सापांना फोटो आणि व्हिडिओसाठी वापरले. त्यांच्याकडून किंग कोब्रा हाताळला जात असल्याचे स्पष्ट पुरावे वनविभागाला मिळाले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्रातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कर्नाटक वनविभागाने शेजारील राज्याची मदत मागितली आहे.
advertisement
कायद्याचे उल्लंघन आणि शिक्षेची तरतूद
किंग कोब्रा हा अत्यंत दुर्मिळ आणि संरक्षित साप आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 नुसार कोणत्याही वन्यजीवाला पकडणे, त्याला बंदिवासात ठेवणे आणि प्रदर्शनासाठी वापरणे हा गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी दोषी आढळल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात किंग कोब्रा केवळ सावंतवाडी-दोडामार्ग परिसरातच आढळतो. असे असतानाही साताऱ्यातील तरुणांकडे त्याचे फोटो सापडल्याने वन्यजीव कार्यकर्त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
लाईक्ससाठी वन्यजीवांचा छळ
या घटनेवर बोलताना साताऱ्याचे मानद वन्यजीव वॉर्डन रोहन भाटे म्हणाले, "सोशल मीडियावर लाईक्स आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी दुर्मिळ सापांचा छळ केला जात आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून तो थांबवणे अत्यावश्यक आहे." तज्ज्ञांच्या मते, वनविभागाने अधिक सतर्क राहून अशा प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या सायबर सेलची मदत घ्यायला हवी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल.
हे ही वाचा : वेळेवर विमानाचं लँडिंग झालं, नाहीतर घडलं असतं भयंकर; कोल्हापूर विमानतळावर नेमंक काय घडलं?