वेळेवर विमानाचं लँडिंग झालं, नाहीतर घडलं असतं भयंकर; कोल्हापूर विमानतळावर नेमकं काय घडलं?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : गुरुवारी सायंकाळी, कोलकात्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या विमानात एका प्रवाशाची प्रकृती अचानक गंभीर झाल्याने खळबळ उडाली. प्रसंगावधान...
Kolhapur News : गुरुवारी सायंकाळी, कोलकात्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या विमानात एका प्रवाशाची प्रकृती अचानक गंभीर झाल्याने खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत विमान कंपनीने 'मेडिकल इमर्जन्सी' जाहीर केली आणि कोल्हापूर विमानतळ प्रशासनाकडे तातडीने उतरण्याची (Priority Landing) परवानगी मागितली. विमानतळ प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता परवानगी दिल्याने विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले, ज्यामुळे रुग्णाला वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली.
नेमके काय घडले?
संबंधित विमान कोलकात्याहून रायपूरमार्गे कोल्हापूरसाठी निघाले होते. रायपूर येथे इंधन भरल्यानंतर दुपारी चार वाजून एक मिनिटांनी विमानाने कोल्हापूरकडे उड्डाण केले. मात्र, प्रवासादरम्यान विमानात असलेल्या एका रुग्णाची प्रकृती अचानक अधिकच बिघडली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पायलटने तात्काळ 'मेडिकल इमर्जन्सी' घोषित केली.
विमान कोल्हापूरच्या हवाई हद्दीत येताच विमान कंपनीने कोल्हापूर विमानतळ प्रशासनाकडे संपर्क साधून लँडिंगला प्राधान्य देण्याची विनंती केली. कोल्हापूर विमानतळ प्रशासनाने ही विनंती तात्काळ मान्य करत विमान उतरवण्यासाठी सर्व तयारी केली. सायंकाळी विमान सुरक्षितपणे उतरले आणि धावपट्टीवर सज्ज असलेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णाला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे कोल्हापूर विमानतळ कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2025 1:01 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
वेळेवर विमानाचं लँडिंग झालं, नाहीतर घडलं असतं भयंकर; कोल्हापूर विमानतळावर नेमकं काय घडलं?