Learning Driving License Rules : वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी! लर्निंग लायसन्सच्या प्रक्रिये होणार बदल? वाचा सविस्तर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
आरटीओकडून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्जदारांना वाहन चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या 'लर्निंग लायसन्स'च्या प्रक्रियेत बदल करण्यात येणार आहे. आरटीओकडून 'लर्निंग लायसन्स'साठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेमध्ये केवळ कागदपत्र तपासण आणि ऑनलाइन चाचणी पुरेशी नसल्याचे राज्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.
रस्त्यावर कोणतेही वाहन चालवण्यासाठी RTO कडून त्याचा अधिकृत परवाना घेणं आवश्यक असतं. RTO कडून वाहन परवाना मिळवण्यासाठी वाहन चालकाला काही परीक्षा द्याव्या लागतात. जर तुम्ही त्या परीक्षा झालात तर तुम्हाला वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसेन्स मिळतं. सर्वात आधी काही महिन्यांसाठी लर्निंग ड्रायव्हिंग लायसेन्स मिळतं. त्यानंतर काही महिन्यांनी तुम्हाला अधिकृत ड्रायव्हिंग लायसेन्स मिळतं. आता या लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रक्रियेमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही बदल करण्याचे ठरवले.
आता आरटीओकडून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्जदारांना वाहन चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या 'लर्निंग लायसन्स'च्या प्रक्रियेत बदल करण्यात येणार आहे. आरटीओकडून 'लर्निंग लायसन्स'साठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेमध्ये केवळ कागदपत्र तपासण आणि ऑनलाइन चाचणी पुरेशी नसल्याचे राज्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले. मुंबई सेंट्रल आरटीओच्या भेटीदरम्यान या प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लायसन्स टेस्टमध्ये हलगर्जीपणा न करण्याची तंबीही यावेळी त्यांनी दिली.
advertisement
वाहन चालक ऑनलाइन पद्धतीने लायसन्स काढू शकतो. यासाठी रहिवासी पुरावा आणि परीक्षा फी भरून काही प्रश्नांची उत्तरे दिल्यावर लगेच लायसन्स मिळते. परंतु या प्रक्रियेतूनही अनेक वाहन चालक पळवाटा काढत असतात. या पळवाटांमुळे गैरवापर होत असल्याचा सरनाईक यांना अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. काहींनी तर माकडांचे फोटो लावून, खोटी नावे देऊन लर्निंग लायसन्स मिळवल्याचे प्रकार होत असल्याचे ते म्हणाले.
advertisement
अनेक वाहन चालकांना तर वाहन कसं चालवावं हे सुद्धा माहिती नाही आणि तरीही त्यांना लर्निंग लायसन्स मिळतं. या लर्निंग लायसन्सच्या जोरावर ते हुल्लडबाजी करतात. त्यामुळे ते स्वत:चा, तसेच इतरांचा जीवदेखील धोक्यात घालत असल्याने लायसन्स जारी करण्याच्या प्रक्रियेच्या वेळेस त्यांचे प्रबोधन करण्याचे निर्देश दिले. लर्निंग लायसन्स जारी करणाऱ्या दोन सहायक मोटार वाहन निरीक्षकांना प्रताप सरनाईक यांनी प्रक्रिया विचारली.
advertisement
दरम्यान, वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेताना सोबत पक्के लायसन्स असलेली व्यक्ती आवश्यक असावी की नाही याबद्दल विचारले. त्यावेळी निरीक्षकांनी नाही असे उत्तर दिले. मुळात पक्के लायसन्स असलेला व्यक्तीसोबत असणे अपेक्षित असताना चुकीचे उत्तर दिल्याने मंत्री सरनाईक यांनी त्यांची कानउघाडणी केली. रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने लायसन्स प्रक्रिया महत्त्वाची असून, त्यात हलगर्जीपणा न करण्याच्या सूचना सुद्धा सरनाईक यांनी सर्व मोटार वाहन निरीक्षकांना दिल्या.
Location :
Maharashtra
First Published :
September 13, 2025 1:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Learning Driving License Rules : वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी! लर्निंग लायसन्सच्या प्रक्रिये होणार बदल? वाचा सविस्तर