आरोपी अवैधरित्या दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांना पाहताच तरुणाने आपण देवीचा भक्त असल्याचं सांगितलं. यानंतर सदर व्यक्तीला पकडून त्याची झडती घेतली असता तो दारूचं चालतं-फिरतं दुकान असल्याचं निष्पन्न झालं. अवैधरीत्या दारू विकल्याप्रकरणी आरोपी यापूर्वीही तुरुंगात गेला आहे. एसपी सिटी स्वतंत्र कुमार यांनी सांगितलं की, हर की पैडी हे दारू प्रतिबंधित क्षेत्र आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी येथे ड्राइव्ह चालवले जातात.
advertisement
धक्कादायक! बारामतीत एका बैलासाठी वाद अन् गोळीबार; तरुणाचा मृत्यू
आरोपीनी ज्या प्रकारे दारूच्या बाटल्या लपवून ठेवल्या ते पाहून पोलीस ठाण्यातील पोलीसही आश्चर्यचकित झाले. पोलिसांनी प्रथम आरोपीचा शर्ट काढला. हा तरुण अनेक ब्रँडची दारू घेऊन चालला होता. या तरुणाच्या युक्त्या पाहून पोलीसही थक्क झाले.
झडतीदरम्यान तरुणाने आपल्या बनियनमधून एकामागून एक दारूच्या बाटल्या काढण्यास सुरुवात करताच पोलीसही चक्रावले. पोलिसांनी या तरुणाची खिल्ली उडवत टाळ्या वाजवल्या. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पती-पत्नीला ब्लॅकमेल -
दुसऱ्या एका घटनेत विनय कुमार साहू याने सिव्हिल परीक्षेत वारंवार नापास झाल्याने चोर बनण्याचा निर्णय घेतला. त्याच्या घराभोवती चोरीच्या घटना घडू लागल्या. तो अनेकदा लोकांचे मोबाईल चोरायचा. काही दिवसांपूर्वी तो चोरी करण्यासाठी एका घरात घुसला होता. त्यावेळी घरात पती-पत्नी संबंध ठेवत होते. चोरी करण्याऐवजी विनयने गुपचूप त्यांचे अश्लील व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ बनवल्यानंतर त्याने ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू केला. त्याने जोडप्याकडे १० लाखाची मागणी केली. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील ही घटना आहे.
